​-तर चित्रपटगृहे पेटवून देऊ; ‘पद्मावती’च्या मेकर्सला पुन्हा मिळाली धमकी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 15:21 IST2017-10-16T09:51:47+5:302017-10-16T15:21:47+5:30

दीपिका पादुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘पद्मावती’वर पुन्हा एकदा संकटाचे ढग जमू लागले आहेत. ...

-Allow theater theaters; Padmavati's hacker gets threatened again! | ​-तर चित्रपटगृहे पेटवून देऊ; ‘पद्मावती’च्या मेकर्सला पुन्हा मिळाली धमकी!

​-तर चित्रपटगृहे पेटवून देऊ; ‘पद्मावती’च्या मेकर्सला पुन्हा मिळाली धमकी!

पिका पादुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘पद्मावती’वर पुन्हा एकदा संकटाचे ढग जमू लागले आहेत. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री स्मृती ईराणी यांनी  ‘पद्मावती’च्या रिलीजमध्ये कुठलाही अडथळा येऊ देणार नाही, असे ठोस आश्वासन दिले असले तरी धमकींचा ‘सिलसिला’ अद्यापही सुरु आहे. होय, करणी सेनेपाठोपाठ जय राजपुताना संघ या राजपूत गटाने ‘पद्मावती’च्या मेकर्सला जाहिर धमकी दिली आहे. रिलीज आधी ‘पद्मावती’ आम्हाला दाखवला गेला नाही आणि आमच्या संमतीविना तो रिलीज झालाच आणि त्यात काही आक्षेपार्ह आढळलेच तर चित्रपटगृहे पेटवून देऊ, असे जय राजपुताना संघाने म्हटले आहे. या संघाचे संस्थापक भंवर सिंह रेटा यांनी ‘हिंदुस्तान टाईम्स’सोबत बोलताना हा धमकीवजा इशारा दिला आहे. ‘आम्ही इतिहासाशी कुठलीही छेडछाड खपवून घेणार नाहीत. राणी पद्मावती आणि अलाऊद्दीन खिल्जी यांच्यातील एकही रोमॅन्टिक सीन भन्साळींनी चित्रपटात दाखवला तर ‘पद्मावती’दाखवणाºया सर्व चित्रपटगृहांना आम्ही आगी लावू. आमच्या संघाच्या सदस्य  तलवारबाजीपासून एके47 चालवण्यात तरबेज आहेत. राणी पद्मावती आणि राजस्थानच्या जनतेचा कुठलाही अपमान आम्ही खपवून घेणार नाही,’ असे त्यांनी म्हटले आहे. जय राजपुताना संघाचे २.६५ लाख सदस्य असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

शूटींगच्या अगदी पहिल्या टप्प्यात करणी सेनेने ‘पद्मावती’च्या सेटवर धिंगाणा घातला होता. ‘पद्मावती’त राणी पद्मावतीच्या व्यक्तिरेखेचे चुकीचे चित्रण करण्यात आल्याचा आक्षेप घेत गत जानेवारीच्या अखेरिस करणी सेनेने राजस्थानच्या जयपूर नजिक जयगढ येथे ‘पद्मावती’च्या सेटवर हल्ला केला होता. यादरम्यान ‘पद्मावती’चे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना मारहाणही करण्यात आली होती. यानंतर ‘पद्मावती’चा सेट कोल्हापुरात हलवण्यात आला होता. पण  काही अज्ञात व्यक्तिंनी या सेटचीही तोडफोड करत त्याल आग लावण्याचा प्रयत्न केला होता. या पश्चात ‘पद्मावती’मध्ये काहीही आक्षेपार्ह असणार नाही. राणी पद्मावती हिच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल, असेही काहीही पडद्यावर दाखवण्याचे आमचे प्रयत्न नाहीत, असे भन्साळी यांनी स्पष्ट केल्यानंतर हा वाद मिटला होता. पण कदाचित चित्रपट पाहिल्याशिवाय अनेकांचे समाधान होणार नाही, असे दिसतेय.

ALSO READ : ‘पद्मावती’च्या कलाकारांनी घेतली तगडी फी! जाणून घ्या किती?

Web Title: -Allow theater theaters; Padmavati's hacker gets threatened again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.