​आलिया-सिद्धार्थ करताहेत लंडनमध्ये हँगआउट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2016 10:26 IST2016-06-26T04:56:53+5:302016-06-26T10:26:53+5:30

मध्यंतरी अशी अफवा पसरली होती की, आलिया भट आणि सिद्धार्थ मल्होत्रा या दोघांचे ब्रेकअप झाले आहे. परंतु नुकतेच दोघे ...

Aliya-Siddhartha is hangout in London | ​आलिया-सिद्धार्थ करताहेत लंडनमध्ये हँगआउट

​आलिया-सिद्धार्थ करताहेत लंडनमध्ये हँगआउट

्यंतरी अशी अफवा पसरली होती की, आलिया भट आणि सिद्धार्थ मल्होत्रा या दोघांचे ब्रेकअप झाले आहे. परंतु नुकतेच दोघे आलियाच्या एका जवळच्या मैत्रिणीबरोबर लंडनमध्ये एन्जॉय करताना दिसले.

दोघांनी जरी कधीही त्यांची रिलेशनशिप उघड नसली तरी लपविण्याचाही कधी प्रयत्न केला नाही. त्यामुळे बॉलीवूडच्या या यंग कपलविषयी नेहमीच उलटसुलट चर्चा सुरू असतात.

आलिया मागच्या आठवड्यात ‘उडता पंजाब’नंतर सुटी घालविण्यासाठी बालपणीची मैत्रीण आकांक्षा रंजनबरोबर लंडनला गेली होती. मग दुसऱ्या दिवशी सिद्धार्थही मियामी येथून १५ दिवसांचे ‘बँग बँग’ शुट संपवून तेथे आला.

हे तिघे मग लंडनमध्ये मौजमस्ती करत शहरभर फिरत होते. तिच्या अशा या ‘जॉली टाईम’चा एक फोटो लीक झाला आहे. यामध्ये सिद, आलिया आणि आकांक्षा एका बेंचवर उन्हात टॅन होण्यासाठी बसलेले आहेत.

चला तर मग सिद-आलियामध्ये सगळे सुरुळीत आहे. त्यांच्या हँग आऊटचे आणखी काही फोटो बाहेर येतात का ते पाहू...

Alia Sid

Web Title: Aliya-Siddhartha is hangout in London

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.