/>चित्रपट निर्माते महेश भट्ट यांची मुलगी आलिया भट्ट हिने खूप कमी वेळेत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. आपल्या कामगिरीमुळे ती नेहमी चर्चेत राहते. परंतु, तिच्या व्यक्तिगत जीवनामुळेही ती सध्या खूप चर्चेत राहायला लागली आहे. अभिनेता सिध्दार्थ मल्होत्रासोबत ती रिलेशनमध्ये असल्याची जोरदार चर्चा आहे. या दोघांचे रिलेशनशिपचे स्टेटस काय आहे, यावर अजूनही सस्पेंस आहे. परंतु, सूत्रानुसार आलिया ही सिद्धार्थ मल्होत्राच्या घरीच अधिक वेळ घालविते. सिद्धार्थ घरी नसला तरीही आलिया तेथे राहते. यापूर्वी एका मुलाखतीत तिने सिद्धार्थसोबत विचारलेल्या एका प्रश्नाला स्पष्टपणे तिने उत्तर दिले होते. आलियाने सिद्धार्थसोबत करण जोहरचा चित्रपट ‘स्टूडेंट आॅफ द ईअर’ पासून बॉलिवूड एन्ट्री केली. या चित्रपटात वरुण धवनही त्यांच्यासोबत होता. तसेच याच वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘कपूर अॅण्ड संस ’यामध्येही आलिया व सिद्धार्थ ही जोडी दिसली होती.
Web Title: Aliya left home for Siddhartha!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.