ओशोंच्या बायोपिकमध्ये आलिया भट साकारणार ही भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 06:00 PM2018-08-31T18:00:09+5:302018-08-31T18:03:46+5:30

अध्यात्मिक गुरू ओशो यांच्यावर चित्रपट बनत असून या चित्रपटात अभिनेत्री आलिया भटदेखील दिसणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

Aliya Bhat will be played this role in Osho's biopic | ओशोंच्या बायोपिकमध्ये आलिया भट साकारणार ही भूमिका

ओशोंच्या बायोपिकमध्ये आलिया भट साकारणार ही भूमिका

ठळक मुद्देआलिया साकारणार माँ आनंद शीला यांची भूमिकाओशोंच्या भूमिकेत दिसणार आमीर खान

सध्या बॉलिवू़डमध्ये बायोपिक चित्रपटांच्या संख्येत वाढ होत असून आता अध्यात्मिक गुरू ओशो यांच्यावर चित्रपट बनत आहे. या चित्रपटात ओशोंच्या भूमिकेत अभिनेता आमीर खान दिसणार असल्याचे बोलले जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बायोपिकमध्ये अभिनेत्री आलिया भटदेखील दिसणार आहे. यात ती माँ आनंद शीला यांच्या भूमिकेत दिसणार असल्याचे बोलले जात आहे.

शकुन बत्राने ओशो यांच्या जीवनावर चित्रपट साकारण्याची तयारी दाखवली असून या प्रोजेक्टससोबत आता अभिनेत्री आलिया भट्टचेही नाव जोडले जात आहे. ओशो यांच्या सेक्रेटरी असणाऱ्या माँ आनंद शीला यांच्या भूमिकेसाठी आलियाच्या नावाला पसंती देण्यात येत आहे. त्यामुळे आता या चित्रपटाची स्टारकास्ट आणि ओशोंविषयीच्या चर्चांना उधाण आले आहे. सूरूवातीला अशी चर्चा होती की आमीरला या सिनेमाच्या स्क्रीप्ट पसंत पडली नव्हती आणि त्याने त्यात बदल करण्याची मागणी केली होती. मात्र आता या चित्रपटाचे काम जोरात सुरू आहे. आमीरने लूक टेस्ट द्यायला सुरूवात केली आहे. या सिनेमाच्या शूटिंगला डिसेंबरमध्ये सुरूवात होणार आहे. 
ओशो हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. १९६० च्‍या दशकात सार्वजनिक वक्ते म्हणून त्‍यांनी भारतभर प्रवास केला होता. समाजवाद, महात्मा गांधी आणि संस्थात्मक धर्मांवर उघड टीका केल्याने ते वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. त्यामुळे त्यांची ही एकंदर कारकिर्द पाहता सिनेरसिकांना ओशो अधिक जवळून पाहण्याची संधी मिळू शकते. दरम्यान, ओशोंच्या या बायोपिकच्या चर्चा खऱ्या ठरल्या तर आलिया आणि आमीर पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. या दोघांना रुपेरी पडद्यावर एकत्र पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Web Title: Aliya Bhat will be played this role in Osho's biopic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.