​आलियाचे ‘अ‍ॅक्टिंग’ सिक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2016 19:52 IST2016-06-24T14:22:21+5:302016-06-24T19:52:21+5:30

केवळ चार वर्षांपूर्वी ‘स्टुडंट आॅफ द ईयर’मधून पदार्पण केलेली आलिया भट सध्या टॉप अ‍ॅक्ट्रेसेसपैकी एक आहे. बबली रोमॅण्टिक हीरोईन ...

Ali's 'acting' secret | ​आलियाचे ‘अ‍ॅक्टिंग’ सिक्रेट

​आलियाचे ‘अ‍ॅक्टिंग’ सिक्रेट

वळ चार वर्षांपूर्वी ‘स्टुडंट आॅफ द ईयर’मधून पदार्पण केलेली आलिया भट सध्या टॉप अ‍ॅक्ट्रेसेसपैकी एक आहे.

बबली रोमॅण्टिक हीरोईन बरोरबच ‘हायवे’ आणि आता ‘उडता पंजाब’ यासारख्या चित्रपटांतून गंभीर कलाकार म्हणून तिने ओळख निर्माण केली आहे.

यामागचे सिक्रेट काय असे विचारल्यावर ती सांगते की, ‘मी काही मेथड अ‍ॅक्टर नाही. भूमिकेशी समरस झाल्यावर त्या क्षणाला मला जे वाटते ते मी साकारते. भूमिकेची गरज काय त्यानुसार मी रोलसाठी तयारी करते.’

बॉक्स आॅफिसचा दबाव ती मानत नाही. ती म्हणते, करिअरच्या ज्या टप्प्यावर मी आहे, तेथून चित्रपट किती कमाई करतो किंवा माझी स्टारव्हॅल्यू काय अशा गोष्टींकडे मी लक्ष देत नाही.

प्रत्येक चित्रपटानुसार स्वत:ला प्रगल्भ अभिनेत्री बनविण्याकडे माझा कल असतो. ‘उडता पंजाब- सेन्सॉर’ वादावर तिने कॉमेंट करण्याचे टाळले.

Web Title: Ali's 'acting' secret

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.