​आलिया भट्टचा ‘एक्स बॉयफ्रेन्ड’ अली दादरकर कोण, कुठला? जाणून घ्या संपूर्ण माहिती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2017 16:47 IST2017-09-20T10:19:02+5:302017-09-20T16:47:43+5:30

आलिया भट्टआलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा आता रिलेशनशिपमध्ये नाहीत. दोघांचेही ब्रेकअप झालेय, हे तुमच्या कानावर आले आहेच. या ब्रेकअपसाठी ...

Alia Bhatt's 'Ex Boyfriend' Ali Dadarkar Who, who? Know the complete information! | ​आलिया भट्टचा ‘एक्स बॉयफ्रेन्ड’ अली दादरकर कोण, कुठला? जाणून घ्या संपूर्ण माहिती!

​आलिया भट्टचा ‘एक्स बॉयफ्रेन्ड’ अली दादरकर कोण, कुठला? जाणून घ्या संपूर्ण माहिती!

िया भट्टआलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा आता रिलेशनशिपमध्ये नाहीत. दोघांचेही ब्रेकअप झालेय, हे तुमच्या कानावर आले आहेच. या ब्रेकअपसाठी ब्रेकअपसाठी जॅकलिन फर्नांडिस जबाबदार असल्याची एक स्टोरीही तुम्ही ऐकली आहे. 
‘अ जेंटलमॅन’च्या शूटींगदरम्यान  सिद्धार्थ व जॅक यांच्यातील क्लोजनेस वाढला आणि नेमकी हीच बाब आलियाला खटकली. जॅक व सिद्धार्थचे शूटींग संपल्यानंतरचे एकत्र डिनर, लाँग ड्राईव्ह  आलियाला पाहावले नाही आणि तिने सिद्धार्थपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. परिणाम ब्रेकअप. पण आता या ब्रेकअप स्टोरीमध्ये आणखी एका ‘व्हिलन’चे (खरे तर व्हिलन नाही तर ‘भूतकाळ’)नाव अ‍ॅड झाले आहे. हे नाव आहे, अली दादरकर.  आता हा अली दादरकर कोण, याची थोडीफार माहिती आम्ही तुम्हाला दिली आहेच.

अलिकडे आलियाचा ताजा फोटो व्हायरल झाला होता. यात ती दुस-या कुणासोबत नाही तर अली दादरकरसोबत दिसली होती. हा अली दादरकर म्हणजे आलियाचा एक्स बॉयफ्रेन्ड.
आलिया व अली दोघेही स्कूल फ्रेन्ड आहेत. मुुंबईत राहणारा अली आता लंडनला शिफ्ट झाला आहे. अली व आलिया हे दोघे बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते, असे मानले जाते. मात्र ‘स्टुडंट आॅफ दी ईअर’मधून आलियाने बॉलिवूड डेब्यू केला आणि यानंतर आलिया व अलीच्या वाटा वेगवेगळ्या झाल्यात. यानंतर आलियाचे नाव सिद्धार्थ मल्होत्राशी जोडले गेले. पण आता अली परतला आहे. याच अलीबद्दल आम्ही आणखी काही माहिती तुम्हाला देणार आहोत..



अलीचा जन्म मुंबईत झाला. जुहूतील जमनाबाई नरसी स्कूलमध्ये त्याचे शालेय शिक्षण झाले.



यानंतर  पुढच्या शिक्षणासाठी लंडनच्या युनिव्हर्सिटी आॅफ ससेक्समध्ये त्याने प्रवेश घेतला.
अली हा पेशाने मॅकॅनिकल इंजिनिअर आहे. लंडनमध्येच त्याने ही पदवी घेतली.



काही काळ तो दुबईतही राहिला.
अलीला एक बहीण आहे. अना दादरकर. फायनान्शिअल मॅनेजमेंटमध्ये तिने पदवी घेतलीय.



ALSO READ : ​सिद्धार्थ मल्होत्रा नाही तर ‘या’ एक्स-बॉयफ्रेन्डसोबत पार्टी करताना दिसली आलिया भट्ट!

आलिया सिद्धार्थ मल्होत्राच्या प्रेमात पडली आणि दूर गेली. हा अलीसाठी खूप मोठा धक्का होता,असे कळते.
अली हा अभिनेता सूरज पांचोलीचा खूप जवळचा मित्र आहे.

Web Title: Alia Bhatt's 'Ex Boyfriend' Ali Dadarkar Who, who? Know the complete information!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.