भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 10:18 IST2025-05-14T10:16:59+5:302025-05-14T10:18:04+5:30

Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भट सध्या चर्चेत आली आहे.

Alia Bhatt took this big decision due to India-Pakistan tension, She will not be debuted in Cannes | भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक

भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक

सिनेविश्वातील मोठा महोत्सव कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२५ आजपासून सुरू होत आहे. अलिकडेच अशी बातमी आली होती की आलिया भट (Alia Bhatt) यावर्षी कान्समध्ये पदार्पण करणार आहे. पण आता अभिनेत्रीच्या जवळच्या एका सूत्राने माहिती दिली आहे की, ती सध्या कान्समध्ये सहभागी होत नाही आहे.

मिड-डेच्या वृत्तानुसार, आलिया भटच्या एका जवळच्या मैत्रिणीने खुलासा केला की, अभिनेत्री कान्सच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार होती. परंतु सध्या तिने तिचे कान्स पदार्पण रद्द केले आहे. याचे कारण भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेला तणाव आहे. यामुळे देशावर मोठा परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत आलियाने कान्समध्ये जाणे टाळले आहे.

आलियाच्या जवळच्या मैत्रिणीचा खुलासा
सूत्रांनी असेही सांगितले, आलियाने सध्या कान्समधील तिचा प्रवेश रद्द केला आहे. पण याचा अर्थ असा नाही की ती या महोत्सवात जाणार नाही. कारण हा महोत्सव ११ दिवस चालणार आहे. अशा परिस्थितीत, अभिनेत्री तिच्या वेळापत्रकानुसार नंतर या महोत्सवात सहभागी होण्याचा विचार करू शकते. आतापर्यंत आलिया भटची या बातमीवर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

वर्कफ्रंट
 वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, आलिया भट शेवटची 'जिगरा' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता वेदांग रैना दिसला होता. हा चित्रपट भाऊ आणि बहिणीच्या कथेवर आधारित होता. पण हा चित्रपट फारसा कमाल दाखवू शकला नाही. आता आलियाकडे 'अल्फा'सह अनेक मोठे प्रोजेक्ट आहेत. जे लवकरच फ्लोअरवर येणार आहेत.

Web Title: Alia Bhatt took this big decision due to India-Pakistan tension, She will not be debuted in Cannes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.