ख्रिसमस पार्टीनंतर आलिया भटने सुरु केलं 'गंगूबाई काठियावाडी'चे शूटिंग, फोटो व्हायरल

By गीतांजली | Updated: December 28, 2020 10:45 IST2020-12-28T10:42:27+5:302020-12-28T10:45:36+5:30

आलिया भट पुन्हा एकदा कामावर परतली आहे.

Alia Bhatt starts shooting for 'gangubai kathiawadi' after christmas party | ख्रिसमस पार्टीनंतर आलिया भटने सुरु केलं 'गंगूबाई काठियावाडी'चे शूटिंग, फोटो व्हायरल

ख्रिसमस पार्टीनंतर आलिया भटने सुरु केलं 'गंगूबाई काठियावाडी'चे शूटिंग, फोटो व्हायरल

बॉयफ्रेंड रणबीर कपूर आणि तिच्या कुटुंबीयांसह ख्रिसमस सेलिब्रेट केल्यानंतर आलिया भट पुन्हा एकदा कामावर परतली आहे. आलियाने संजय लीला भन्साळी यांच्या 'गंगूबाई काठियावाडी'च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. अभिनेत्री बर्‍याचदा सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असते. तिने मिरर सेल्फी शेअर केला आहे, ज्यामध्ये ती खुर्चीवर बसलेली दिसते आहे. या फोटोंवरुन आपण अंदाज लावू शकतो की ती तिच्या शूटसाठी मेकअप करायला बसली आहे. अभिनेत्रीने तिचा हा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहे. आलियाने तिचा चेहरा फोनने पूर्ण कव्हर केला आहे. ब्लॅक रंगाचे आऊटफिट तिने घातले आहे. संजय लीला भन्साळीच्या प्रोजेक्टपूर्वी ती महाबळेश्वरमध्ये 'आरआरआर' च्या शूटिंगमध्ये होती.


'गंगूबाई काठियावाडी' सिनेमात डॉन गंगूबाईची कथा दाखवण्यात आली आहे आणि चित्रपटात आलिया भट डॉनच्या भूमिकेत आहे. गंगूबाई साठच्या दशकात मुंबई माफियाचे नाव मोठे होते. असे सांगितले जाते की तिच्या नवऱ्याने तिला फक्त ५०० रुपयांसाठी विकले होते. त्यानंतर ती वेश्या व्यवसायात रुळली होती.'गंगूबाई काठियावाडी' चित्रपट स्त्री केंद्रीत आहे आणि या चित्रपटाची कहाणी आलिया भटच्या अवतीभवती फिरते.

या चित्रपटात अजय देवगणदेखील केमिओ करताना दिसणार आहे. 'गंगूबाई काठियावाडी' यानंतर आलिया  ब्रह्मास्त्र, एसएस राजामौली यांच्या आरआरआर सिनेमात दिसणार आहे. 

Web Title: Alia Bhatt starts shooting for 'gangubai kathiawadi' after christmas party