आलिया भटनं तिच्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगला केली सुरुवात, म्हणाली - 'मी खूप नर्व्हस आहे..'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 04:37 PM2022-05-19T16:37:05+5:302022-05-19T16:37:31+5:30

Alia Bhatt: आलिया भट हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

Alia Bhatt started shooting for her first Hollywood movie, saying - 'I'm so nervous ..' | आलिया भटनं तिच्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगला केली सुरुवात, म्हणाली - 'मी खूप नर्व्हस आहे..'

आलिया भटनं तिच्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगला केली सुरुवात, म्हणाली - 'मी खूप नर्व्हस आहे..'

googlenewsNext

अभिनेत्री आलिया भट(Alia Bhatt)ने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर आपली ओळख निर्माण केली आहे. जेव्हापासून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले तेव्हापासून तिने मागे वळून पाहिलेच नाही. आलिया भटने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता ती हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिने 'हार्ट ऑफ स्टोन' (Heart Of Stone) या हॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात केली आहे. आलिया भटने सोशल मीडियावर माहिती दिली आहे की, तिने तिच्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.

आलिया भटने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले की, 'मी माझ्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाचे शूटिंग करणार आहे. पुन्हा एकदा नवखे असल्यासारखे वाटतेय. मी खूप घाबरले आहे. मला शुभेच्छा द्या. आलिया भटच्या पोस्टवर सर्व सेलिब्रिटी तिच्या हॉलिवूड पदार्पणासाठी शुभेच्छा देत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलिया भट हॉलिवूड चित्रपट हार्ट ऑफ स्टोनमध्ये गैल गॅ़डोट आणि जेमी डोर्ननसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. आलिया भट या जासूसी थ्रिलरसाठी युकेला रवाना झाली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन टॉम हार्पर करत आहे. ती मे ते ऑगस्टच्या अखेरपर्यंत या चित्रपटाचे शूटिंग करणार आहे.


वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर आलिया भट याशिवाय दिग्दर्शक करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात धर्मेंद्र, शबाना आझमी, जया बच्चन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'जी ले जरा' या चित्रपटात आलिया प्रियंका चोप्रा आणि कतरिना कैफसोबत काम करताना दिसणार आहे. फरहान अख्तर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.

Web Title: Alia Bhatt started shooting for her first Hollywood movie, saying - 'I'm so nervous ..'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.