आलिया भटने शेअर केला विनामेकअपचा फोटो, चेहऱ्यावरचे डाग पाहून फॅन्सना बसला धक्का, पाहा हा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 16:28 IST2020-03-18T16:26:52+5:302020-03-18T16:28:21+5:30
एरव्ही अतिशय सुंदर दिसणाऱ्या आलियाच्या चेहऱ्यावर काळे डाग असून ते या फोटोत स्पष्टपणे दिसत आहेत.

आलिया भटने शेअर केला विनामेकअपचा फोटो, चेहऱ्यावरचे डाग पाहून फॅन्सना बसला धक्का, पाहा हा फोटो
बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री विना मेकअपमधील फोटो शेअर करत असतात. त्यात आता अभिनेत्री आलिया भटने नो मेकअप लूक इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. विना मेकअप लूकमध्ये ती खूपच वेगळी दिसत असून तिचा हा लूक पाहून तिच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे. कारण एरव्ही अतिशय सुंदर दिसणाऱ्या आलियाच्या चेहऱ्यावर काळे डाग असून ते या फोटोत स्पष्टपणे दिसत आहेत.
आलिया सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर नुकताच तिचा विनामेकअपचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो तिने घरात असताना काढलेला असून या फोटोत ती रिलॅक्स मूडमध्ये दिसत आहे. आलियाला अनेकवेळा विमानतळावर विना मेकअपचे पाहाण्यात येते. पण पहिल्यांदाच तिने विना मेकअपचा सेल्फी शेअर केला आहे.
आलिया सध्या तिच्या गंगुबाई काठियावाडी या चित्रपटाच्या चित्रीकरण बिझी आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी करणार असून या सिनेमात एका धमाकेदार रुपात महिला गँंगस्टरची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. आलिया पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटात गँगस्टारची भूमिका साकारणार आहे. पण सध्या कोरोना व्हायरसच्या थैमानामुळे या चित्रपटाचे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले आहे.
या चित्रपटाची कथा ही हुसैन जैदी यांच्या ‘माफिया क्विन ऑफ मुंबई’ या पुस्तकावर बेतलेली आहे. पण खरी कथा ही गंगूबाई काठीयावाडी हिच्या आयुष्यावर आधारित आहे. या पुस्तकानुसार, गंगूबाई गुजरातच्या काठियावाडमध्ये राहणारी होती. त्यामुळे तिला काठियावाडी म्हटले जात असे. लहान वयात गंगूबाईला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले गेले. कुख्यात गुन्हेगार गंगूबाईकडे येत. मुंबईच्या कमाठीपुरा भागात गंगूबाई ‘कोठा’ चालवायची. या गंगूबाईने सेक्सवर्करच्या मुलांसाठी प्रचंड मोठे काम केले. गंगूबाई काठियावाडीचे खरे नाव गंगा हरजीवनदास होते. गंगूबाईला लहानपणी अभिनेत्री बनायचे होते. वयाच्या 16 व्या वर्षी गंगूबाईला तिच्या वडिलांच्या दिवाणजीसोबत प्रेम झाले आणि ती त्याच्यासोबत लग्न करून मुंबईला पळून आली. आपला पती मुंबईत गेल्यावर आपल्याला धोका देईल, याचा तिने स्वप्नातही विचार केला नव्हता. पण पतीने केवळ 500 रूपयात गंगूबाईला एका कोठ्यावर विकले.