शाळेतल्या बाथरुममध्ये आलिया भट्ट जे काम करायची ते ऐकून तुम्हालाही बसेल धक्का !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 18:43 IST2021-02-04T18:39:52+5:302021-02-04T18:43:03+5:30
आलिया भट्ट सध्या दोन प्रोजेक्टवर काम करत आहे.पहिला सिनेमा हा 'ब्रह्मास्त्र' आहे आणि दुसरा सिनेमा 'गंगूबाई काठियावाडी' आहे. तब्बल तीन महिने शूटिंग केल्यानंतर आता सिनेमाची शूटिंग जवळपास पूर्ण झाली आहे.

शाळेतल्या बाथरुममध्ये आलिया भट्ट जे काम करायची ते ऐकून तुम्हालाही बसेल धक्का !
अभिनेत्री आलिया भट्ट... अगदी कमी वयातच जिने आपल्या अभिनयाने चित्रपटरसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलं आहे. प्रत्येक चित्रपटात वेगळी भूमिका साकारत आलियाने आपल्यातील अभिनयकौशल्य दाखवून दिले आहे. 2 स्टेट्स, हम्प्टी शर्मा की दुल्हनिया, उडता पंजाब, हायवे, डिअर जिंदगी, बद्रीनाथ की दुल्हनिया, राजी ते 'गलीबॉय' चित्रपटात आलियाने विविधरंगी भूमिका साकारल्या आहेत. या भूमिकांमुळे आलियाची चित्रपटसृष्टीतील आघाडीची नायिक म्हणून गणना होते.
आलिया भट्ट तिच्या खासगी आयुष्यामुळेही जास्त चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून तिच्या अफेअरच्या चर्चा रंगत आहेत. रणबीर कपूरसह तिच्या लग्नाच्याही चर्चा रोज ऐकायला मिळतात. अशात आणखी एका गोष्टीमुळे आलिया पुन्हा चर्चेत आली आहे. शाळेत असताना आलियाला एक सवय होती. घरी झोप पुरेशी होत नसल्याने आलिया जेव्हा जेव्हा शाळेत बाथरुममध्ये जायची तेव्हा तिथेच तिला झोप लागायची.
शाळेतल्या बाथरुममध्ये झोपण्याची सवय असल्याचे खुद्द आलियाने सांगितले होते. या सवयीमुळे आलियाला शिक्षकांनी शिक्षाही केली आहे. शिक्षा होवू नये म्हणून तरी तिच्या मित्रांनी अशी चूक करु नये.म्हणून ती वारंवार मित्रांना तिच्या या सवयीविषयी चर्चा करायची आणि मित्रांकडून अशी चूक होवू नये म्हणून त्यांना समजवण्याचाही प्रयत्न करायची.
आलिया भट्ट सध्या दोन प्रोजेक्टवर काम करत आहे.पहिला सिनेमा हा 'ब्रह्मास्त्र' आहे आणि दुसरा सिनेमा 'गंगूबाई काठियावाडी' आहे. तब्बल तीन महिने शूटिंग केल्यानंतर आता सिनेमाची शूटिंग जवळपास पूर्ण झाली आहे. पण, सिनेमातील आलियाचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही. गंगूबाई काठियावाडी चित्रपटात आलियाची मुख्य भूमिका आहे.
दिवसरात्र सिनेमाच्या शूटिंग करण्यात आलिया व्यस्त असल्यामुळे तिला इतका त्रास झाला की, थेट हॉस्पिटलमध्येच दाखल करावे लागले होते. त्यानंतरही आराम न करता थेट दुस-याच दिवशी अलिया हॉस्पिटलमधून गंगूबाई काठियावाडीच्या शूटवर पोहचली आणि अर्धवट राहिलेले शूट पूर्ण केले.