का फिरतेय रुग्णालया बाहेर आलिया भट्ट आईसोबत ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 16:12 IST2017-09-26T10:28:50+5:302017-09-26T16:12:03+5:30
आलिया भट्ट आपली आई सोनी राजदान सोबत रुग्णालयाच्या बाहेर स्पॉट झाली आहे. त्यामुळे तिचे चाहते नक्कीच चिंतेत असतील. आलियाला ...
.jpg)
का फिरतेय रुग्णालया बाहेर आलिया भट्ट आईसोबत ?
आ िया भट्ट आपली आई सोनी राजदान सोबत रुग्णालयाच्या बाहेर स्पॉट झाली आहे. त्यामुळे तिचे चाहते नक्कीच चिंतेत असतील. आलियाला असे काय झाले की अचानक तिला आईसोबत रुग्णालयात जाण्याची वेळ का आली. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की अखेर आलियावर रुग्णालयात जायची वेळ का आली आहे.
सध्या आलिया आपला आगामी चित्रपट राजीच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. जर तुम्हाला वाटले असेल की शूटिंगदरम्यान तब्येत बिघडल्याने तिला रुग्णालयात भर्ती करण्याची वेळ आली असेल तर असे काहीही झालेले नाही आहे. राजीमध्ये ती आपल्या आईसोबत दिसणार झळकणार आहे. आलियाची खरी आई चित्रपटातही तिच्या आईची भूमिका साकारते आहे. स्क्रिप्टनुसार एक सीन्स रुग्णालयातला होता. ज्यामुळे ही आई-मुलीची जोडी रुग्णालया बाहेर दिसली. शूटिंगसाठी आलिया आणि सोनी राजदान जम्मूमधल्या पहलगावमधल्या सरकरी रुग्णालयात गेल्या होत्या. त्याठिकाणी दोघींना पाहण्यासाठी जवळपास 300 फॅन्स जमा झाले होते. चित्रपटातील आलियाच्या लूकबाबत बोलायचे झाले तर शूटिंगच्या दरम्यान ती विना मेकअप पंजाबी ड्रेसमध्ये दिसली होती.
ALSO READ : जॅकलिन फर्नांडिस नाही तर या व्यक्तीमुळे झाले आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्राचे ब्रेकअप ?
आलिया आपल्या चित्रपटाच्या टीमसोबत सध्या जम्मू-काश्मीरमध्ये शूटिंग करते आहे. यात आलिया एक कश्मीरी मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. यात आलियाचे लग्न एका पाकिस्तानी आर्मी ऑफिसरशी होते. तिच्या पतीची भूमिका विकी कौशल साकारतो आहे. 1971साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान ती भारतातील गुप्त माहिती पाकिस्तानी अधिकाऱ्यांना देते. हा चित्रपट हरिंदर सिक्का यांच्या कॉलिंग सहमत या कांदबरीवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करते आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यानंतर ती आर्यन मुखर्जीच्या ड्रगन चित्रपटात रणबीर कपूरसोबत झळकणार आहे. आलिया आणि रणबीरची जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना ऑनस्क्रिनवर दिसणार आहेत. तर यानंतर आलिया जोया अख्तर दिग्दर्शित गली बॉय चित्रपटात ही झळकणार आहे. यात तिची जोडी रणवीर सिंगसोबत जमणार आहे. आलियाला ऐकूणच चित्रपटांची लॉट्ररी लागली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.