नज़र नहीं हटती! आलियानं आजवर कधीच पोस्ट न केलेले खास क्षण अखेर सर्वांसमोर आणले, पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 15:05 IST2022-12-28T15:02:10+5:302022-12-28T15:05:36+5:30
बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री आलिया भट हिच्यासाठी २०२२ हे वर्ष नक्कीच खूप खास ठरलं आहे.

नज़र नहीं हटती! आलियानं आजवर कधीच पोस्ट न केलेले खास क्षण अखेर सर्वांसमोर आणले, पाहा Video
बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री आलिया भट हिच्यासाठी २०२२ हे वर्ष नक्कीच खूप खास ठरलं आहे. २०२२ या वर्षाचे शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. आलियाचे लाखो चाहते आहेत आणि इन्स्टाग्रामवरही तिचे ७३ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. आलिया तिच्या आयुष्यातील असेच खास क्षण चाहत्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम इन्स्टाग्रामच्या माध्यमातून करत असते. मग ते कुठलं नवं फोटो शूट असो, वॅकेशन असो किंवा मग आयुष्यातील खास क्षण आलिया इन्स्टाग्रामवर सक्रीय आहे.
आता वर्षाचा शेवट गोड करताना आलियानं आपल्या चाहत्यांसाठी तिच्या आयुष्यातील अशा खास फोटोंचं एक रिल शेअर केलं आहे की ज्यात तिनं आजवर कधीच शेअर न केलेले फोटोंना प्राधान्य दिलं आहे. २०२२ या वर्षात आलियानं तिच्या मोबाइलमध्ये टिपलेले सुंदर फोटो आणि व्हिडिओ जे इन्स्टाग्रामवर ती कधी पोस्ट करू शकली नाही. जे फक्त तिच्या मोबाइलच्या गॅलरीमध्येच होते. ते फोटो आणि व्हिडिओ तिनं आज इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. या रिलचं कॅप्शनच आलियानं असे फोटो जे मी इन्स्टाग्रामवर वर्षभरात पोस्ट करू शकले नाही, असं दिलं आहे.
आलियानं शेअर केलेल्या या रिलमध्ये तिचे अनेक सुंदर क्षणांचे फोटो आहेत. तर वॅकेशन मोडवरचे व्हिडिओ देखील आहेत. साखरपुड्यासाठी तयार होतानाचाही एक फोटो यात आहे. तर आपल्या क्यूट मांजरीसोबतचेही काही क्षण यात आहेत. आइस्क्रिम असो किंवा मग डिनर डेट अशा अनेक क्षणांना तिनं उजाळा दिला आहे. बिजवर बर्थ डे सेलिब्रेशन केल्याचाही एक फोटो यात दिसतो. आलियानं शेअर केलेल्या रिलवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.