Alia Bhatt Birthday : लंडनमध्येही आहे आलिया भटचं आलिशान घर, तिच्या संपत्तीचा आकडा पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 12:05 PM2023-03-15T12:05:42+5:302023-03-15T12:08:40+5:30

Alia Bhatt : आलिया भट १५ मार्चला तिचा ३० वा वाढदिवस साजरा करते आहे.

Alia Bhatt Birthday: Alia Bhatt's luxurious house is also in London, you will be shocked to see the amount of her wealth | Alia Bhatt Birthday : लंडनमध्येही आहे आलिया भटचं आलिशान घर, तिच्या संपत्तीचा आकडा पाहून व्हाल थक्क

Alia Bhatt Birthday : लंडनमध्येही आहे आलिया भटचं आलिशान घर, तिच्या संपत्तीचा आकडा पाहून व्हाल थक्क

googlenewsNext

बॉलिवूडची राझी गर्ल आलिया भट (Alia Bhatt) हिचा आज वाढदिवस असून तिने दहा वर्षांच्या कारकिर्दीत चांगलेच यश संपादन केले आहे. आलियाला 'कम्प्लीट वुमन' म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आलिया एक प्रोफेशनल अभिनेत्री, मुलगी, सून, पत्नी, आई तसेच बिझनेस वुमन आहे. आलियाने प्रत्येक पावलावर आपण कोणापेक्षा कमी नाही हे सिद्ध केले आहे.

आलिया भट १५ मार्चला तिचा ३० वा वाढदिवस साजरा करते आहे. आलिया सुरुवातीपासूनच करिअर ओरिएंटेड आहे. ती केवळ एक प्रख्यात अभिनेत्री नाही तर एक बिझनेसवुमन म्हणूनही खूप प्रगती करत आहे. आलियाने नुकताच स्वतःचा उपक्रम सुरू केला आहे. अभिनेत्रीने तिच्या गरोदरपणात तिचे फॅशन लेबल एड-ए-मम्मा पुन्हा लाँच केले. आलियाने हा व्यवसाय ऑक्टोबर २०२० मध्ये महामारीच्या काळात सुरू केला होता.

हा किड्स वेअर ब्रँड आहे, ज्यामध्ये आलियाने मॅटर्निटी आउटफिट्सचा देखील समावेश केला आहे. आलियाच्या बिझनेस सेन्सचेही कौतुक करावे लागेल. कारण आलियाने हे फॅशन लेबल केवळ १६०० आउटफिट ऑप्शन्ससह सुरू केले आणि आता ते एक कोटीपर्यंत पोहोचले. तिने याआधी केवळ एका ऑनलाइन पोर्टलने याची सुरुवात केली होती, परंतु आतापासून ते अनेक स्टोअरमध्ये आणि पोर्टलवर उपलब्ध आहे. हा ब्रँड चाहते आणि ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय होत आहे.

अॅड-ए-मम्मा व्यतिरिक्त, आलिया इतर अनेक गुंतवणूक प्रकल्पांचा एक भाग आहे. आलियाने तिचे पैसे Phool.co मध्येही गुंतवले आहेत. ही कंपनी पाण्यात फेकल्या जाणाऱ्या टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करते. याशिवाय, अभिनेत्रीने सौंदर्य आणि फॅशन प्लॅटफॉर्म Nykaa आणि वैयक्तिक स्टाइलिंग प्लॅटफॉर्म StyleCracker मध्ये गुंतवणूक केली आहे.

वडिलांकडून ५०० रुपयांची मागणी करत आलियाने आता कोट्यवधी रुपयांची मालक बनण्याचा निर्णय घेतला आहे. आलियाने एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा ती लहान होती तेव्हा ती महेश भटच्या पायावर क्रीम कशी लावायची, जेणेकरून पप्पा खूश होतील आणि तिला ५०० रुपये देतील. याला उत्तर देताना महेश भट म्हणाले होते  की आलिया लहान होती तेव्हा ती माझ्या पायावर ५०० रुपयांना क्रीम लावून द्यायची. पण आज तिने आपल्या मेहनतीने आणि समर्पणाने एवढा पैसा कमावला आहे जो मी माझ्या आयुष्यात गेल्या ५० वर्षात कमावला नाही.

वडील महेश भट्ट यांचेही म्हणणे बरोबर आहे. दहा वर्षांच्या कारकिर्दीत आलिया भट करोडोंच्या संपत्तीची मालकीण बनली आहे. तिची एकूण संपत्ती २९९ कोटी रुपये आहे. फोर्ब्सच्या सेलिब्रिटींच्या यादीनुसार, आलियाने २०१७ मध्ये सुमारे ३९.८८ कोटी, वर्ष २०१८ मध्ये ५८.८३ कोटी आणि वर्ष २०१९ मध्ये ५९.२१ कोटी कमावले. थोडक्यात सांगायचे तर आलियाचे वार्षिक उत्पन्न अंदाजे ६० कोटी इतके आहे. रिपोर्ट्सनुसार, आलिया एका चित्रपटासाठी २० कोटी रुपये घेते. मात्र, चित्रपटात तिची भूमिका किती आणि कशी आहे यावर ही रक्कम अवलंबून असते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार तर आलियाचे मुंबईत दोन आणि लंडनमध्ये एक घर आहे. लंडनमधील घराची किंमत सुमारे ३७ कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे. आणि मुंबईतील जुहू फ्लॅट, जिथे अभिनेत्री लग्नापूर्वी राहायची. त्याची किंमत १३.११ कोटी एवढी आहे. याशिवाय आलियाने मुंबईत आणखी एक घर विकत घेतले आहे, जे बांद्रा येथील रणबीर कपूरच्या बॅचलर पॅडजवळ आहे. त्याची किंमत ३२ कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे. आलिया मुख्यतः एफडी आणि बाँडद्वारे तिचे पैसे सुरक्षित ठेवण्यास प्राधान्य देते. आलिया भट्ट लक्झरी लाइफ जगते. तिला महागड्या वाहनांचीही खूप आवड आहे. अभिनेत्रीकडे १.७० कोटी किमतीची BMW 7 मालिका, ७० लाख किमतीची Audi A6, ९० लाख किमतीची Audi Q7 आणि Range Rover Vogue आहे, ज्याची किंमत भारतात अंदाजे ३ कोटी आहे. 

Web Title: Alia Bhatt Birthday: Alia Bhatt's luxurious house is also in London, you will be shocked to see the amount of her wealth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.