‘ब्रह्मास्त्र’नंतर भेटणार भट्ट व कपूर कुटुंब? आलिया व रणबीरच्या नात्यावर होणार शिक्कामोर्तब?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 08:55 AM2018-08-30T08:55:54+5:302018-08-30T08:57:52+5:30

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर एकमेकांना डेट करताहेत, हे कुणापासूनही लपून राहिलेले नाही. पण आता हे लव्हबर्ड्स लवकरच लग्न करणार, अशी चर्चा जोरात आहे. 

alia bhatt and ranbir kapoors parents to meet soon on family dinner | ‘ब्रह्मास्त्र’नंतर भेटणार भट्ट व कपूर कुटुंब? आलिया व रणबीरच्या नात्यावर होणार शिक्कामोर्तब?

‘ब्रह्मास्त्र’नंतर भेटणार भट्ट व कपूर कुटुंब? आलिया व रणबीरच्या नात्यावर होणार शिक्कामोर्तब?

googlenewsNext

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर एकमेकांना डेट करताहेत, हे कुणापासूनही लपून राहिलेले नाही. पण आता हे लव्हबर्ड्स लवकरच लग्न करणार, अशी चर्चा जोरात आहे. दोघांमधील वाढती जवळीकही हेच सांगणारी आहे. आता एक ताजी बातमी आहे. होय, आलिया व रणबीरचे कुटुंब आता एकमेकांना भेटणार आहेत.   ब्रह्मास्त्रचे शूटींग संपताच भट्ट आणि कपूर कुटुंबाने फॅमिली डिनरचा प्लान केला असल्याचे कळतेय. खरे तर आलिया व रणबीर दोघांचाही एकमेकांच्या कुटुंबासोबत खूप चांगला बॉन्ड आहे. आलिया अनेकदा रणबीरची मॉम नीतू कपूर यांच्यासोबत दिसली आहे. रणबीरची बहीण रिद्धिमा हिच्यासोबतही आलिया दिसली आहे. रणबीरही अर्ध्या रात्री आलियाचे डॅड महेश भट्ट यांच्यासोबत दिसला आहे. केवळ इतकेच नाही तर आलियाचा आई सोनी राजदान ही सुद्धा रणबीरची फॅन आहे. नीतू सिंग व सोनी राजदान या दोघींनी अलीकडे ‘संजू’ हा रणबीरचा चित्रपट एकत्र पाहिला होता. या साऱ्या गोष्टी आलिया व रणबीर आपल्या नात्याबद्दल गंभीर आहेत, याकडे इशारा करणा-या आहेत.
आलिया व रणबीर दोघेही सध्या बुल्गेरियात ‘ब्रह्मास्त्र’चे शूटींग करत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदा आलिया-रणबीरची आॅनस्क्रीन जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. सोनम कपूरच्या लग्नात या दोघांना एकत्र पाहिले गेले आणि तिथूनच त्यांच्या अफेअरविषयी चर्चा सुरू झाल्या.  आलियाआधी रणबीर कॅटरिना कैफसोबत सीरिअस रिलेशनशिपमध्ये होता. पण अचानक त्यांचे ब्रेकअप झाले होते. कॅटरिनापूर्वी दीपिका पादुकोण रणबीरच्या आयुष्यात होती.

 

Web Title: alia bhatt and ranbir kapoors parents to meet soon on family dinner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.