इज्राइलमध्ये कॉफीचा आनंद लुटतायेत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 12:13 IST2018-01-03T06:43:02+5:302018-01-03T12:13:02+5:30

ये जवानी है दीवानी चित्रपटानंतर अयान मुखर्जी रणबीर कपूर पुन्हा एकदा एकत्र काम करण्यासाठी तयार आहेत. दोघे 'ब्रह्मस्त्र' चित्रपटात ...

Alia Bhatt and Ranbir Kapoor enjoy coffee in Israel | इज्राइलमध्ये कॉफीचा आनंद लुटतायेत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर

इज्राइलमध्ये कॉफीचा आनंद लुटतायेत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर

जवानी है दीवानी चित्रपटानंतर अयान मुखर्जी रणबीर कपूर पुन्हा एकदा एकत्र काम करण्यासाठी तयार आहेत. दोघे 'ब्रह्मस्त्र' चित्रपटात एकत्र काम करणार आहेत ऐवढेच नाही तर या चित्रपटाची तयारी देखील त्यांनी सुरु केली आहे. चित्रपटाचे शूटिंग फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्याक सुरु होणार आहे. मात्र चित्रपटाच्या शूटिंगच्या आधीची ट्रेनिंग सुरु झाली आहे. यासाठी अयान मुखर्जी, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट इज्राइला गेले आहेत.

चित्रपटाच्या शूटिंगच्या आधी तिघे इज्राइलमध्ये सकाळचा आनंद घेताना दिसले. हा चित्रपट धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार करण्यात येणार आहे. करण जोहरने सोशल मीडियावर या तिघांचे इज्राइलमधले फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये तिघे कॉफीचा आनंद घेताना दिसतायेत.  


या चित्रपटात रणबीर आलियाशिवाय बिग बी अमिताभ बच्चनसुद्धा दिसणार आहेत. पहिल्यांदाच रणबीर आणि आलिया एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. हा चित्रपट तीन भागांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. याचा पहिला भाग  १५ ऑगस्ट २०१९ ला रिलीज केला जाणार आहे. या चित्रपटासाठी रणबीरने घोडेस्वारी आणि जिम्नॅस्टिकची ट्रेनिंगसुद्धा घेतले  आहे. या चित्रपटाचे नाव आधी 'ड्रॅगन' असे ठरवण्यात आले होते. अयान मुखर्जी अनेक दिवसांपासून या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत होता. ज्यात एक सुपरहिरो आहे आणि त्याच्याकडे अद्नभुत शक्ति आहेत. या कथेला अनुसरून करण जोहरने या चित्रपटाचे नाव 'ब्रह्मस्त्र' असे ठेवले आहे.  

ALSO READ :  रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ समोरासमोर येतात तेव्हा..

लवकरच रणबीर कपूरचा संजय दत्तच्या 'बायोपिक'मध्ये दिसणार आहे. यात तो संजय दत्तची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी त्यांने त्याच्या शरीरयष्ठीवर देखील खूप मेहनत घेतली आहे. तर आलिया भट्ट मेघना गुलजारच्या 'राजी'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रॉडक्शन करतो आहे. यात ती विकी कौशलसोबत दिसणार आहे.  ‘राजी’मध्ये आलिया एका काश्मीरी मुलीची भूमिका साकारणार आहे. जिचा विवाह पकिस्तानी लष्कर अधिकाºयाशी होतो. यावर्षी आलियाकडे चित्रपटांची लिस्ट आहे त्यामुळे तिचे चाहते नक्कीच खूष असतील.   

Web Title: Alia Bhatt and Ranbir Kapoor enjoy coffee in Israel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.