Alia Bhatt : आई झाल्यानंतर आलिया भटनं वर्कआउटला केली सुरुवात, चाहते झाले नाराज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 18:30 IST2022-12-07T18:30:09+5:302022-12-07T18:30:40+5:30
Alia Bhatt : आलिया भट आता आई बनल्यानंतर जवळपास महिनाभरानंतर वर्कआउटला सुरुवात केली आहे. वर्कआउटसाठी बाहेर पडलेल्या आलियाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जो पाहून लोक चकित झाले आहेत.

Alia Bhatt : आई झाल्यानंतर आलिया भटनं वर्कआउटला केली सुरुवात, चाहते झाले नाराज
आलिया भट (Alia Bhatt) आई बनल्यानंतर अवघ्या महिन्याभरातच फिटनेस रुटीनवर गेली आहे. आलिया भटचा लेटेस्ट व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ती वर्कआउटसाठी घरातून बाहेर पडताना दिसत आहे. आलिया नुकतीच ६ नोव्हेंबरला आई झाली आणि आता ७ डिसेंबरला ती वर्कआउटसाठी निघताना दिसली. या व्हिडिओमध्ये आलियाची फिगर पाहून लोक चकित झाले आहेत.
या व्हिडिओमध्ये आलिया भट ब्लॅक आउटफिटमध्ये अगदी साधी दिसत आहे. व्हिडिओमध्ये आलिया सामान्य अवस्थेत दिसत आहे आणि हे पाहून लोक चकित झाले आहेत. मात्र, आलियाने मुलाला इतक्या लवकर सोडणे लोकांना पसंत नाही. लोकांनी विचारले - बाळ कुठे आहे? काही लोकांनी तिला मुलीसोबत राहण्याचा सल्ला दिला आहे. युजरने म्हटले आहे की, 'तुम्हा दोघांना एकमेकांची गरज आहे, नॅनीची नाही. तुम्ही नंतर वर्क आणि वर्कआउट देखील करू शकता.
आलिया भट आणि रणबीर कपूर यांनी त्यांच्या मुलीचे नाव राहा ठेवले आहे. दोघांनी यावर्षी १४ एप्रिलला लग्न केले आणि २ महिन्यांनंतर त्यांनी सोशल मीडियावर आई झाल्याची गोड बातमी शेअर केली.