आलिया भटचा स्टाईल मंत्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2018 12:46 IST2018-01-12T07:16:03+5:302018-01-12T12:46:03+5:30
बॉलिवूड इंडस्ट्री नेहमीच आपल्या स्टाईल बद्दल सतर्क असते. आपल्या चाहत्यांमध्ये आपला लूक "ट्रेंडी" असावा यासाठी ते पुरेपूर प्रयत्न करत ...
.jpg)
आलिया भटचा स्टाईल मंत्रा
ब लिवूड इंडस्ट्री नेहमीच आपल्या स्टाईल बद्दल सतर्क असते. आपल्या चाहत्यांमध्ये आपला लूक "ट्रेंडी" असावा यासाठी ते पुरेपूर प्रयत्न करत असतात. बॉलिवूड ची "ग्लॅमडॉल" म्हणून ओळखली जाणारी आलिया भट ही तिच्या ट्रेंडी स्टाईल आणि कुल लूक मुळे चर्चेत असते. ती नेहमीच आपल्याला एकदम हटके स्टाईलमध्ये पाहायला मिळते. सध्या ती तिच्या स्टाईलसोबतच आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आहे.
आलिया भट्ट सध्या स्टाईलक्रॅकर या कंपनीत तिने केलेल्या गुंतवणुकीमुळे चांगलीच चर्चेत आहे. या कंपनीसोबतच आलियाने वर्षाच्या सुरुवातीला पुणेकरांना ट्रेंडी आणि स्वत:चे स्टाईल स्टेटमेंट देण्याचा कानमंत्र दिला आहे. नाईट मार्केटच्या माध्यमातून पुण्यातील तरूणाईला बड्या डिझाईनर्सची स्टाईल आजमावता येणार आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनर अर्चना वालावलकर ही स्टाईलक्रॅकरची संस्थापक आहे. नुकतीच आलिया भटने या कंपनीत गुंतवणूकही केली आहे. पुणे हे तरूणांच्या फॅशन स्टाईलसाठी एक उत्तम बाजारपेठ आहे. स्टाईलक्रॅकरला ऑनलाईनही उतम प्रतिसाद मिळाला आहे. तेव्हा ऑफलाईनदेखील पुणेकर याला नक्कीच पसंती देतील. मुंबईत अशाप्रकारच्या मार्केटला हजारो लोकांनी हजेरी लावली होती, अशाचप्रकारे पुण्यातही हे मार्केट चांगलेच गाजेल असे अर्चना वालावलकर यांनी सांगितले. स्टाईलक्रॅकर पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये नाईट मार्केट आयोजित करत आहे. मुंबईप्रमाणेच पुणेही आता धावपळीचे शहर बनत आहे, त्यात पुण्यात वाढत चाललेल्या आयटी इंडस्ट्रीच्या जाळ्यामुळे इथे तरूणाईची संख्याही मोठी असते. हीच तरूणाई आपला प्रोफेशनल आणि पर्सनल लूक सतत बदलत अनेक नवनवीन स्टाईल्स ट्राय करते. तेव्हा नाईट मार्केट हे पुणेकरांसाठी खास पर्वणी ठरणार आहे. शिवाय या नाईट मार्केट मध्ये अनेक ब्रॅंड्सचे कपडे तसेच मनोरंजन, वेगवेगळे खाद्यपदार्थ आणि बरेच सरप्राइझेसही पुणेकरांसाठी आहेत. आलियाची स्टायलिस्ट अर्चना वालावलकर या मराठमोळ्या स्टायलिस्टलाही भेटता येणार आहे.
आलिया सध्या या तिच्या नव्या इनिंगसाठी खूपच उत्सुक आहे. आलिया ही स्वतः स्टायलिस्ट असल्याने तिचा हा स्टाईल मंत्री तिच्या फॅन्सना देखील आवडेल अशी तिला खात्री आहे.
Also Read : या दिग्दर्शकामुळे झाले आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्राचे पॅचअप?