​अलिया भट सांगतेय मी माझ्या चाहत्यांना कधीही देऊ शकते हा धक्का...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 11:13 IST2018-06-07T05:43:51+5:302018-06-07T11:13:51+5:30

आलिया भट आज आघाडीची अभिनेत्री आहे. तिने गेल्या अनेक वर्षांत हायवे, टू स्टेट, उडता पंजाब, बद्रिनाथ की दुल्हनिया, राजी ...

Alia Bhat tells me that I can never give my fans the push ... | ​अलिया भट सांगतेय मी माझ्या चाहत्यांना कधीही देऊ शकते हा धक्का...

​अलिया भट सांगतेय मी माझ्या चाहत्यांना कधीही देऊ शकते हा धक्का...

िया भट आज आघाडीची अभिनेत्री आहे. तिने गेल्या अनेक वर्षांत हायवे, टू स्टेट, उडता पंजाब, बद्रिनाथ की दुल्हनिया, राजी यांसारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. राजी या चित्रपटानंतर कलंक, ब्रम्हस्त्र या चित्रपटांमध्ये आलिया झळकणार आहे. ब्रम्हास्त्र या चित्रपटात रणबीर कपूर आलियासोबत काम करत असून ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. आलिया आणि रणबीरच्या अफेअरच्या चर्चांनंतर आता ते दोघे कधी लग्न करणार याची उत्सुकता त्यांच्या फॅन्सना लागलेली आहे.
अलिया भट लग्न कधी करणार याबद्दल हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तिने नुकतेच सांगितले आहे. ती सांगते, लोक विचार करत आहे त्याच्या आधीच मी लग्न करून लोकांनाच नव्हे स्वतःला देखील एक आश्चर्याचा धक्का देऊ शकते. सध्या तरी मी लग्नाचा काहीही विचार केलेला नाहीय पण खरे सांगू या गोष्टींचा मी विचार करेन अशी मी व्यक्तीच नाहीये. जसा जसा काळ पुढे सरकतो, तशा तशा काही गोष्टी या आपोआप होतात असे मला वाटते. मी हा निर्णय अचानकच घेईन असे मला कधीकधी वाटते. उगाचच आयुष्याचा खूप जास्त विचार करणारी मी व्यक्ती नाहीये. ज्यावेळी तुम्ही कधीही विचार करत नाही, त्याचवेळी काही चांगल्या गोष्टी अनपेक्षितपणे घडतात असे मला वाटते. 
रणबीर कपूरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे की, ‘हे सध्या खूपच नवनवीन आहे. त्यामुळे मला यावर फारचे बोलायचे नाही. यास (नात्याला) आणखी काही काळ हवा आहे. काही तरी स्पेस हवी आहे. एक कलाकार म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून आलिया खूपच चांगली आहे. जेव्हा मी तिचे काम बघतो, तिचा अभिनय बघतो किंवा तिच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल जाणून घेतो तेव्हा ती खूपच महत्त्वाकांक्षी असल्याचे मला दिसते. दोघांविषयी सांगायचे झाल्यास, आमच्यासाठी हे सर्व नवे आहे. त्यामुळे ते आणखी पुढे जायला हवे.’

Also Read : प्लॅस्टिक विरोधातील सर्वात मोठ्या लढाईसाठी आलिया भट्ट ‘राजी’, अर्जुन कपूरचाही ‘एलान-ए-जंग’!

Web Title: Alia Bhat tells me that I can never give my fans the push ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.