अक्षय सूसाट!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2016 18:14 IST2016-07-27T12:44:10+5:302016-07-27T18:14:10+5:30
अक्षय कुमारच्या करिअरची गाडी सध्या सूसाट वेगाने धावतेयं. अक्षयचा ‘रूस्तम’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. ‘रूस्तम’ चर्चेत असतानाच अक्षयने ...

अक्षय सूसाट!!
अ ्षय कुमारच्या करिअरची गाडी सध्या सूसाट वेगाने धावतेयं. अक्षयचा ‘रूस्तम’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. ‘रूस्तम’ चर्चेत असतानाच अक्षयने ‘जॉली एलएलबी2’चे शूटींग सुरु केले आहे (या चित्रपटासाठी अक्षयने ४२ कोटी रुपए फी घेतल्याचे कळते.) आणि ताज्या बातमीनुसार, ‘जॉली एलएलबी2’ पूर्ण होण्याआधीच अक्षयने आणखी एक सिनेमा साईन केला आहे. होय, ‘सनम रे’च्या दिग्दर्शक दिव्या खोसला कुमार यांचा चित्रपट अक्षयने साईन केल्याची खबर आहे. या चित्रपटात अक्षयच्या अपोझिट कोण अभिनेत्री असेल, हे अद्याप ठरलेले नाही. मात्र ‘जॉली एलएलबी2’चे शूटींग संपल्यानंतर सप्टेंबरच्या दुसºया वा तिसºया आठवड्यात या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होणार आहे. अक्षय व दिव्या दोघेही चांगले मित्र आहेत. अशात दिव्याची आॅफर नाकारणे अक्षयसाठी शक्यच नव्हते. त्यामुळे अक्षयने दिव्याला होकार दिला. येत्या काही दिवसात या चित्रपटाचे नावही तुम्हाला कळेल...तोपर्यंत जस्ट वेट!!