अक्षय कुमार हा बॉलिवूडमध्ये अत्यंत फिट अॅण्ड फाईन व्यक्तीमत्त्वाचा व्यक्ती आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने ७ एप्रिल रोजी ‘वर्ल्ड हेल्थ ...
अक्षय-राजू हिराणी ‘हेल्थ डे’ व्हिडीओ
/>अक्षय कुमार हा बॉलिवूडमध्ये अत्यंत फिट अॅण्ड फाईन व्यक्तीमत्त्वाचा व्यक्ती आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने ७ एप्रिल रोजी ‘वर्ल्ड हेल्थ डे’ निमित्ताने एक व्हिडिओ प्रसिध्द क रणार असून यामध्ये अक्षय आणि राजू हे दोघे मुख्य भूमिका साकारणार आहे. यावेळी वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशन डायबेटिस यावर लक्ष केंद्रित करणार आहे. त्यामुळे त्या रुग्णांना संदेश देण्यासाठी राजकुमार हिरानी दिग्दर्शित एक व्हिडिओ बनविण्यात आला आहे. अक्षय आणि ‘पीके’चे दिग्दर्शक राजू यांचा पहिल्यांदाच एकत्रित व्हिडिओ यानिमित्ताने प्रेक्षकांना बघावयास मिळणार आहे. ‘बिर्इंग इंडियन’ म्हणून यू ट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ प्रसिध्द करण्यात येईल. संजय देशमुख हे अॅडिशनल म्युनिसिपल कमिशनर देखील व्हिडिओचा भाग असणार आहेत.