​अक्षयने केली निर्मात्याच्या किडनी आॅपरेशनसाठी मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2016 11:01 IST2016-10-21T10:59:23+5:302016-10-21T11:01:31+5:30

अक्षयकुमार त्याच्या मदत करण्याच्या स्वभावासाठी ओळखला जातो. नुकतेच्या त्याच्या ‘बडे दिलवाला’ वृत्तीची प्रचीती आली. त्याला चित्रपटसृष्टीत ब्रेक देणाऱ्या निर्मात्याच्या ...

Akshay made help for Kidney Operation | ​अक्षयने केली निर्मात्याच्या किडनी आॅपरेशनसाठी मदत

​अक्षयने केली निर्मात्याच्या किडनी आॅपरेशनसाठी मदत

्षयकुमार त्याच्या मदत करण्याच्या स्वभावासाठी ओळखला जातो. नुकतेच्या त्याच्या ‘बडे दिलवाला’ वृत्तीची प्रचीती आली. त्याला चित्रपटसृष्टीत ब्रेक देणाऱ्या निर्मात्याच्या किडनी आॅपरेशनसाठी तो आणि त्याची टीम मदतीला धावून आली.

अक्षयने इंडस्ट्रीमध्ये जो पहिला चित्रपट साईन केला होता त्या ‘द्वारपाल’ सिनोमाचा निर्माता रवी श्रीवास्तव सध्या अत्यंत बीकट परिस्थितीमध्ये राहतोय. आर्थिक परिस्थिती संपूर्णपणे ढासळल्यामुळे त्याच्या कुटुंंबियांना त्याची किडनी ट्रान्सप्लँट करण्यासाठी येणारा खर्च परवडणारा नव्हता. त्यामुळे रवी घरी अंथरुना खिळून होता.

याविषयीची बातमी जेव्हा एका चाहत्याने अक्षयला ट्विट करून कळवली तेव्हा त्याने लगेच आपल्या टीमला रवीकडे पाठवून त्याच्या उपचाराची व्यवस्था केली. ट्विटवरूनच त्याने त्या चाहत्याला याबद्दल सांगितले. त्याने लिहिले की, ‘होय सर, माझी टीम रवीच्या संपर्कात असून त्याची संपूर्ण काळजी घेतली जाईल.’

अक्षयची बॉलीवूडमध्ये एन्ट्री ‘सौंगध’ सिनेमाने झाली असली तरी त्याने त्यापूर्वी ‘द्वारपाल’ हा सिनेमा साईन केला होता. मात्र काही कारणास्तव तो चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही. तेव्हा रवीने अक्षयला ‘सौंगध’ सिनेमा मिळवून देण्यासाठी मदत केली होती. आपल्या पहिल्या निर्मात्याच्या उपकारांची जाण ठेवून अक्षयने एक  आदर्श उदहारण त्याच्या तमाम चाहत्यांचसमोर ठेवले आहे.

   Akshay with Ravi अक्षयकुमार आणि  रवी श्रीवास्तव

अक्षयसाठी हे वर्ष फार चांगले ठरले असून ‘एअरलिफ्ट’, ‘हाऊसफुल ३’ आणि ‘रुस्तम’ यांनी बॉक्स आॅफिसवर घसघशीत कमाई केली आहे. ‘जॉली एलएलबी’ हा त्याचा हुमा कुरेशीसोबत पुढील चित्रपट असून नीरज पांडेच्या ‘नाम शबाना’मध्ये तो पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारत आहे. तसेच ‘कॅ्रक ’ सिनेमासाठी तो विशेष तयारी करणार असल्यासचे सांगितले जातेय.

Web Title: Akshay made help for Kidney Operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.