अक्षय कुमारचा गोल्डचा फर्स्टलूक आऊट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2017 15:35 IST2017-07-03T09:42:25+5:302017-07-03T15:35:17+5:30
अक्षय कुमार सध्या बायोपिकमध्ये काम करण्यात बिझी आहे. लवकरच अक्षय त्याचा नवा चित्रपट गोल्ड घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...
.jpg)
अक्षय कुमारचा गोल्डचा फर्स्टलूक आऊट
अ ्षय कुमार सध्या बायोपिकमध्ये काम करण्यात बिझी आहे. लवकरच अक्षय त्याचा नवा चित्रपट गोल्ड घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या शूटिंगसाठी खिलाडी कुमार लंडनला रवाना झाला आहे. इंस्टाग्रामवर अक्षयने चित्रपटातील फर्स्ट लूकचा फोटो शेअर केला आहे. या फोटोखाली अक्षयने एक कॅप्शनसुद्धा लिहिले आहे. गोल्ड चित्रपटाच्या शूटिंगचा पहिलाच दिवस. नेहमीसारखे तुमचे प्रेम आणि शुभेच्छा पाठिमागे असू देत.
![]()
अक्षयने शेअर केलेल्या फोटोत त्याला मिशा आणि बाजूला एक बॅग लावलेली दिसत आहेत. गोल्डमुळे पहिल्यांदा अक्षय कुमार रितेश सिंधवानी आणि फरहान अख्तरसोबत काम करणार आहे. रिमा कागती या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. छोट्या पडद्यावर नागिनी साकारणारी मौनी रॉय गोल्डमधून मोठ्या पडद्यावर पर्दापण करतेय. अक्षय आणि मौनीसह कुणाल कपूर, अमित साध यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अक्षय कुमार या चित्रपटात हॉकी कोच बलबीर सिंग यांच्या भूमिकेत दिसणार आहे. बलबीर सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी टीम ऑलम्पिंकमध्ये 3 वेळा गोल्ड मेडल जिंकली होती. 15 ऑगस्ट 2018 ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गोल्डच्या टीमला हॉकीची ट्रेनिंग भारताचे माजी कोच संदीप सिंग यांनी दिली. भारतीय हॉकी संघाचा महत्त्वपूर्ण 12 वर्षांच्या इतिहास या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाची बरीचशी शूटिंग ब्रिटनमधल्या ब्रैडफोर्टमध्ये होणार आहे. या चित्रपटाची कथा राजेश देवराज यांनी लिहिली आहे.
अक्षय कुमाराचा भूमी पेडणेकरसोबतचा टॉयलेट एक प्रेमकथा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वच्छता भारत अभियानवर आधारित हा चित्रपट 11 ऑगस्टला रिलीज होणार आहे.