अक्षय कुमारवर कोसळला दु:खाचा डोंगर, ह्रदयविकाराच्या झटक्याने भावाचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 09:27 AM2020-05-16T09:27:29+5:302020-05-16T09:51:07+5:30

मुंबईतल्या राहत्या घरी ह्रदयविकाराचा झटक्याने निधन झाले.

Akshay kumars cousin and kahaani ghar ghar ki actor sachin kumar passed away gda | अक्षय कुमारवर कोसळला दु:खाचा डोंगर, ह्रदयविकाराच्या झटक्याने भावाचे निधन

अक्षय कुमारवर कोसळला दु:खाचा डोंगर, ह्रदयविकाराच्या झटक्याने भावाचे निधन

googlenewsNext

अभिनेता अक्षय कुमारच्या कुटुंबीयांवर सध्या दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अक्षय कुमारच्या भाऊ सचिन कुमार यांचे निधन झाले आहे. सचिन अक्षय कुमारच्या आत्येचा मुलगा होते. सचिन स्टार प्लसवरील प्रसिद्ध मालिका 'कहानी घर घर की' आणि सोनीवरील 'लज्ज' मध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. मुंबईतल्या अंधेरीमध्ये राहत्या घरी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांचे वय ४२ वर्षे होते. 


 
एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार, गुरुवारी रात्री सचिन आपल्या खोलीत झोपायला गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी दर उघडले नाही. अशात दुसऱ्या चावीच्या सहाय्याने दार उघडण्यात आले. दरवाजा उघडल्यानंतर सचिन यांचा मृतदेह बेडवर होता. काही वर्षांपूर्वी अभिनयात यश न मिळाल्यामुळे सचिन यांनी प्रोफेशनल फोटोग्राफी सुरु केली होती आणि यात ते खुश होते. 

रिपोर्टनुसार सचिनने हसमुख आणि सकारात्मक व्यक्ती होते जे दुसऱ्यांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असायचेय. 'लज्जा' मालिकेचे निर्माते बेनाफर कोहली यांनी सचिन यांच्या अकस्मात निधनावर शोक व्यक्त केला आहे.

Read in English

Web Title: Akshay kumars cousin and kahaani ghar ghar ki actor sachin kumar passed away gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.