अक्षय कुमारच्या ‘त्या’ कमेंटने भडकले मल्लिका दुआचे पापा! वाचा, सविस्तर घटना!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 10:37 IST2017-10-26T05:04:07+5:302017-10-26T10:37:20+5:30

कॉमेडियन मल्लिका दुआने अलीकडे  #MeToo  मोहिमेअंतर्गत तिच्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाची घटना उजागर केली होती. हीच मल्लिका पुन्हा एकदा चर्चेत ...

Akshay Kumar's 'Comment' Mallika Dua's father! Read, a detailed event !! | अक्षय कुमारच्या ‘त्या’ कमेंटने भडकले मल्लिका दुआचे पापा! वाचा, सविस्तर घटना!!

अक्षय कुमारच्या ‘त्या’ कमेंटने भडकले मल्लिका दुआचे पापा! वाचा, सविस्तर घटना!!

मेडियन मल्लिका दुआने अलीकडे  #MeToo  मोहिमेअंतर्गत तिच्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाची घटना उजागर केली होती. हीच मल्लिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.   ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या टीव्ही शोची जज म्हणून दिसलेल्या मल्लिकावर अक्षय कुमारने अशी काही टीप्पणी केली की, मल्लिकाचे वडिल व ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ जाम भडकले. गमतीगमतीत अक्षय कुमार या शोमध्ये असा काही बोलून गेला की, विनोद दुआंचा राग अनावर झाला. अक्षयने शोमध्ये वापरलेल्या भाषेवर तीव्र आक्षेप नोंदवत त्यांनी एक क्लिपिंग शेअर केली आहे. यात शोचा स्पर्धक श्याम रंगीलाच्या परफॉर्मन्सनंतर अक्षय मल्लिकाला उद्देशून एक टिप्पणी करताना दिसतोय.



‘मल्लिकाजी आप बेल बजाओ, मैं आपको बजाता हूं,’असे अक्षय मल्लिकाला म्हणतोय. मल्लिकाच्या वडिलांनी अक्षयच्या नेमक्या याच वाक्यावर बोट ठेवले आहे.  ''आपल्या महिला सहकाºयास अक्षय कुमार ‘आप बेल बजाओ, मैं आपको बजाता हूं’, असे म्हणतोयं. ही त्याची भाषा अन् सेन्स आॅफ ह्युमर आहे. स्टार प्लस...जाग जाओ...'', अशी पोस्ट त्यांनी केली.अर्थात काही वेळानंतर त्यांनी ही पोस्ट डिलिटही केली.



ही संपूर्ण घटना ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ शोचा स्पर्धक श्याम रंगलीच्या अ‍ॅक्टनंतर घडली. राजस्थानातून आलेल्या रंगीलाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिमिक्री करत सगळ्यांना लोट-पोट करून सोडले होते. शोच्या नियमानुसार,स्पर्धकाने खूप चांगला परफॉर्मन्स केल्यास वर लावलेली मोठी घंटा वाजवली जाते. रंगीलाच्या परफॉर्मन्सनंतर अक्षयने घंटा वाजवण्यासाठी मल्लिकाला स्टेजवर बोलवले. यावेळी अन्य दोन टीम लीडर जाकिर आणि हुसैन दलाल हेही याठिकाणी होते. मल्लिकाने घंटा वाजवण्यासाठी पुढे सरकत तेव्हा अक्षय तिला मागे ओढत ‘आप घंटी बजाओ मैं आपको बजाता हू,’असे म्हणतो. त्याच्या याच वाक्यावरून पुढचे सगळे रामायण घडले. पापांचा राग व संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मल्लिकाही अ‍ॅक्टिव्ह झाली. मग तिनेही अक्षयच्या त्या वाक्यावर आक्षेप नोंदवला. अक्षय मला जे बोलला, ते तो त्याच्या मुलीला म्हणणार का? असा सवाल तिने केला.

ASLO READ: ​या अभिनेत्रीने MeToo हा हॅशटॅग वापरून सांगितले की, सातव्या वर्षी झाले होते माझे लैंगिक शोषण

पण खरे सांगायचे तर मल्लिासोबत शोवर घडलेल्या या घटनेला बरेच दिवस झाले आहेत. शिवाय कमी टीआरपीमुळे मल्लिकाची शोमधून हकालपट्टीही करण्यात आली आहे. यानंतर कुठे इतक्या दिवसांनी मल्लिकाला जाग आलीय.

Web Title: Akshay Kumar's 'Comment' Mallika Dua's father! Read, a detailed event !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.