अक्षय कुमारच्या कॅनडा पासपोर्टवरून वाद! विचारल्यावर दिले चकित करणारे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2017 10:49 IST2017-02-23T05:19:11+5:302017-02-23T10:49:11+5:30

अक्षय कुमारकडे दोन देशांचे पासपोर्ट असल्यामुळे सध्या वाद सुरू आहे. खिलाडी कुमारकडे कॅनडा आणि भारत अशा दोन देशांचे नागरिकत्व ...

Akshay Kumar's Canada passport! Asked wondered answers | अक्षय कुमारच्या कॅनडा पासपोर्टवरून वाद! विचारल्यावर दिले चकित करणारे उत्तर

अक्षय कुमारच्या कॅनडा पासपोर्टवरून वाद! विचारल्यावर दिले चकित करणारे उत्तर

्षय कुमारकडे दोन देशांचे पासपोर्ट असल्यामुळे सध्या वाद सुरू आहे. खिलाडी कुमारकडे कॅनडा आणि भारत अशा दोन देशांचे नागरिकत्व असल्याचे कळतेय. परंतु भारतीय कायद्यानुसार भारतीय नागरिक एका वेळी केवळ एकच नागरिकत्व ठेवू शकतो. म्हणजे अक्षयकडे जर कॅनडाचा पासपोर्ट असेल तर त्याला भारतीय पासपोर्ट रद्द करावा लागेल. त्यामुळे त्याला भारतामध्ये मतदान करण्याचा अधिकार राहणार नाही.

‘जॉली एलएलबी २’चे यश साजरे करताना अक्षयने मीडियाशी संवाद साधला असता त्याला याबाबत विचारण्यात आले. तेव्हा तो म्हणाला की, ‘कॅनडा सरकारने मला मानद पासपोर्ट दिला आहे.’ त्याच्या या उत्तरावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्याच्या जवळच्या सुत्रांनी सांगितले की, ‘कॅनडाच्या सरकारने जरी त्याला मानद (आॅनररी) पासपोर्ट जरी दिला असला तरी याचा अर्थ असा नाही की, त्याने भारतीय नागरिकत्व सोडले. तो अजूनही भारतीय आहे.’

पण येथे वादाचा मुद्दा असा की, कॅनडाच्या नियमानुसार, तेथील सरकार एखाद्या व्यक्तीला तेव्हाच मानद नागरिकत्व बहाल करू शकते जेव्हा संपूर्ण संसदेची त्या निर्णयाला मंजुरी मिळते. आता अक्षय कुमारसाठी ते एवढे कष्ट का घेतील हे कळण्यास काही मार्ग नाही. कॅनडाने आतापर्यंत केवळ सहाच लोकांना असे अधिकृतरीत्या मानद नागरिकत्व दिलेले असून त्यामध्ये नेल्सन मंडेला आणि मलाला युसूफजाई यासारख्या महान विभूतींचा समावेश आहे.

आता अक्षयने केवळ वेळ मारून नेण्यासाठी असे उत्तर दिले की, त्यामागे काही दुसरे कारण आहे? लवकरच त्याने या प्रकारणातील त्याची बाजू स्पष्ट करावी. कारण अक्षय एक सामाजिक जाण असलेला अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्या नागरिकत्वासंबंधी संभ्रम त्वरीत दूर करण्याची त्याची प्रमुख जबाबदारी आहे.

ALSO READ: ​उच्च न्यायालयातूनही अक्षय कुमारला मिळाला नाही दिलासा

Web Title: Akshay Kumar's Canada passport! Asked wondered answers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.