'गोल्ड'ची शूटिंग अक्षय कुमार लवकरच करणार सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2017 11:22 IST2017-06-30T05:51:42+5:302017-06-30T11:22:39+5:30

अक्षय कुमारने आपल्या आगामी चित्रपट गोल्डचे शूटिंग लवकरच सुरु करणार आहे. एक वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार रीमा कागती हिने आपल्या गोल्ड ...

Akshay Kumar will soon start shooting for 'Gold' | 'गोल्ड'ची शूटिंग अक्षय कुमार लवकरच करणार सुरु

'गोल्ड'ची शूटिंग अक्षय कुमार लवकरच करणार सुरु

्षय कुमारने आपल्या आगामी चित्रपट गोल्डचे शूटिंग लवकरच सुरु करणार आहे. एक वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार रीमा कागती हिने आपल्या गोल्ड चित्रपटचे शूटिंग सुरु केले आहे. रीमाने या आधी 'हनीमून ट्रव्हल्स प्राईव्हेट लिमिटेड' आणि 'तलाश' सारखे चित्रपट तयार केले आहेत. आता ती आपला आगामी चित्रपट गोल्डच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अक्षय कुमार, अमित साद. सनी कौशल आणि कुणाल कपूर यांच्या या चित्रपट मुख्य भूमिका आहेत. तसेच छोट्या पडद्यावर नागिन बनलेली मौनी रॉय या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करत असल्याचे समजते आहे. अक्षय कुमार या चित्रपटात हॉकी कोच बलबीर सिंग यांच्या भूमिकेत दिसणार आहे. बलबीर सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी टीम ऑलम्पिंकमध्ये 3 वेळा गोल्ड मेडल जिंकली होती. बलबीर सिंग यांना हॉकीमध्ये गोलचे उस्ताद मानले जाते. 15 ऑगस्ट 2018 ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे बरीचशी शूटिंग ब्रिटनमधल्या ब्रैडफोर्टमध्ये होणार आहे. सध्या चित्रपटाची टीम हॉकीची ट्रेनिंग घेते आहे. भारताचे माजी कोच संदीप सिंग चित्रपटाच्या टीमला ट्रेनिंग देता आहेत.  रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या प्रोडक्शनखाली हा चित्रपट तयार करण्यात येत आहे.  या चित्रपटाची कथा राजेश देवराज यांनी लिहिली आहे. भारतीय हॉकी संघाचा महत्त्वपूर्ण 12 वर्षांच्या इतिहास या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. आतापर्यंत भारतात खेळाडूंच्या आयुष्यावर बनलेले चित्रपट हिट गेले आहेत. त्यामुळे हा ही चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आशी आशा आहे. हॉकीचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहता. 

Web Title: Akshay Kumar will soon start shooting for 'Gold'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.