कुख्यात माजी दरोडेखोराची अक्षय कुमारला धमकी, वाचा काय आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 15:12 IST2019-09-26T15:11:52+5:302019-09-26T15:12:37+5:30
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याने काही दिवसांपूर्वी ‘पृथ्वीराज’ या त्याच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज केला होता. लवकरच या चित्रपटाचे शूटींग सुरु करणार असल्याचे अक्षयने म्हटले होते. पण आता ‘पृथ्वीराज’चे शूटींग सुरु होण्यापूर्वीच एक धक्कादायक बातमी आहे.

कुख्यात माजी दरोडेखोराची अक्षय कुमारला धमकी, वाचा काय आहे कारण
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याने काही दिवसांपूर्वी ‘पृथ्वीराज’ या त्याच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज केला होता. लवकरच या चित्रपटाचे शूटींग सुरु करणार असल्याचे अक्षयने म्हटले होते. पण आता ‘पृथ्वीराज’चे शूटींग सुरु होण्यापूर्वीच एक धक्कादायक बातमी आहे. होय, एकेकाळी चंबळ खो-यातील ‘वाघ’ म्हणून कुख्यात असलेला माजी दरोडेखोर मल्खन सिंग याने अक्षयला धमकी दिली आहे. ‘पृथ्वीराज’मध्ये तथ्यांशी छेडछाड होता कामा नये, अन्यथा कोर्टात जाऊ, असा इशारा मल्खनने अक्षयला दिला आहे.
‘चित्रपटाच्या कथेमध्ये आमचे पूर्वज खेत सिंग यांना योग्य ते स्थान मिळायला हवे. खेत सिंग यांनीपृथ्वीराज चौहान यांच्या मध्य प्रदेशमधील टीकमगढमधील कुंडार किल्ल्याची स्थापना महाराज केली होती. त्यामुळे या चित्रपटाच्या कथेमध्ये त्यांना योग्य ते स्थान मिळालाच हवे. असे न झाल्यास आम्ही न्यायालयात जाऊ’, असा इशारा मल्खन सिंगने दिला आहे. अक्षयने हा चित्रपट बनवण्यापूर्वी मला भेटून ऐतिहासिक तथ्य जाणून घ्यावीत. तथ्यांशी छेडछाड आम्ही कदापि खपवून घेणार नाही, असेही तो म्हणाला.
मी कधीच दरोडेखोर नव्हतो. मी केवळ एक बंडखोर होतो. ज्याला न्याय नाकारला गेला, असा दावाही मल्खनने केला आहे.
यश राज फिल्म्सच्या या चित्रपटात अक्षय कुमार राजा पृथ्वीराज यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. चंद्र्रप्रकाश द्विवेदी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट २०२० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तूर्तास अक्षयकडे अनेक चित्रपट आहेत. रोहित शेट्टीचा सूर्यवंशी, करण जोहरचा गुड न्यूज, बच्चन पांडे, लक्ष्मी बॉम्ब अशा अनेक चित्रपटांत तो बिझी आहे.