​ अन् अक्षय कुमारने वाचले पत्नी ट्विंकलने लिहून दिलेले भाषण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 16:12 IST2017-08-07T10:42:46+5:302017-08-07T16:12:46+5:30

बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार पत्नी ट्विंकलवर किती प्रेम करतो, हे तुम्हाला ठाऊक आहेच. ट्विंकलची कुठलीच गोष्ट अक्षय टाळत नाही. ...

Akshay Kumar read out the speech written by wife Twinkle! | ​ अन् अक्षय कुमारने वाचले पत्नी ट्विंकलने लिहून दिलेले भाषण!

​ अन् अक्षय कुमारने वाचले पत्नी ट्विंकलने लिहून दिलेले भाषण!

लिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार पत्नी ट्विंकलवर किती प्रेम करतो, हे तुम्हाला ठाऊक आहेच. ट्विंकलची कुठलीच गोष्ट अक्षय टाळत नाही. विश्वास बसत नाही ना? तर चला, ताजा किस्सा ऐकाच. तर किस्सा आहे, वोग ब्युटी अवार्ड सोहळ्याचा. अलीकडे हा सोहळा पार पडला. या सोहळ्याला अक्षयने हजेरी लावली. ट्विंकल अक्षयसोबत नव्हती. पण ट्विंकलने लिहून दिलेले भाषण मात्र अक्षयसोबत होतेच. या सोहळ्यात अक्षयला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.आता पुरस्कारानंतर दोन शब्द तर बोलावे लागणारच. अक्षयच्या हातात माईक आला तसे आता अक्षय काय बोलणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले. पण हे काय? बोलण्याऐवजी अक्षय स्वत:चे खिसे चाचपडू लागला. या खिशात काय होते? तर ट्विंकलने लिहून दिलेले भाषण. ‘माझा बायकोने मला भाषण लिहून दिले आहे. ते तिने वाचायला सांगितले आहे. त्यामुळे तुमची इच्छा असो किंवा नसो पण मला हे भाषण वाचून दाखवावेच लागेल, असे अक्षय म्हणाला अन् त्याने ट्विंकलने लिहून दिलेले अख्खे भाषण वाचून दाखवले. 
‘या पुरस्कारासाठी मी वोगचे आभार मानतो. तसेच मी माझ्या ट्रेनरचे आभार मानतो ज्याला मी सर्वाधिक मानधन देतो आणि माझ्यासाठी जेवण करणाºया त्या आचाºयाचेही आभार मानतो ज्याला मी फार कमी पगार देतो. यांच्यामुळेच मी सुंदर आणि सुदृढ आहे. याचबरोबर मी माझ्या बायकोचेही आभार मानतो. कारण नऊ महिने माझे बाळ माझ्या पोटात नव्हते, त्यामुळे माझी फिगर बिघडली नाही. तिने फार तडजोडी केल्या, तिने मला दोन सुंदर मुलं दिली. इथून निघण्यापूर्वी मी माझ्या सुंदर आणि हुशार बायकोचे आभार मानू इच्छितो,’ असे हे भाषण होते. आता ट्विंकलने लिहून दिलेले हे अनोखे भाषण अक्षयने वाचून दाखवल्यानंतर काय झाले असेल, याची कल्पना तुम्ही करू शकताच. अहो, काय म्हणजे काय, अख्खा हॉल पोट धरून हसू लागला.

Web Title: Akshay Kumar read out the speech written by wife Twinkle!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.