अरेच्चा! नेटकऱ्यांनी नेमकी शोधली अक्षय कुमारच्या ‘राम सेतू’च्या पोस्टरमधील चूक 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 04:19 PM2022-04-29T16:19:52+5:302022-04-29T16:22:07+5:30

Akshay Kumar Ram Setu First Look : अक्षयने आज ‘रामसेतू’ चित्रपटाचं पोस्टर रिलीज केलं. अक्की हे पोस्टर शेअर करत नाही तोच या पोस्टरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली.

Akshay Kumar Ram Setu First Look Poster Big Mistake Pointed By Fans | अरेच्चा! नेटकऱ्यांनी नेमकी शोधली अक्षय कुमारच्या ‘राम सेतू’च्या पोस्टरमधील चूक 

अरेच्चा! नेटकऱ्यांनी नेमकी शोधली अक्षय कुमारच्या ‘राम सेतू’च्या पोस्टरमधील चूक 

googlenewsNext

Akshay Kumar Ram Setu First Look : बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमारचे (Akshay Kumar ) अनेक सिनेमे येत्या काळात  प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. यापैकीच एक आहे ‘राम सेतू’ (Ram Setu). दिवाळीच्या मुहूर्तावर हा सिनेमा चित्रपटगृहांत धडकणार आहे. तूर्तास याचा फर्स्ट लुक रिलीज झाला आहे. अक्षयने आज या चित्रपटाचं  पोस्टर रिलीज केलं. अक्की हे पोस्टर शेअर करत नाही तोच या पोस्टरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली. होय, या पोस्टरमधील चूक नेटकऱ्यांनी नेमकी हेरली.

पोस्टरमध्ये अक्षय कुमार, जॅकलिन फर्नांडिस आणि सत्यदेव एका अंधाऱ्या गुहेत दिसत आहेत. अक्षय कुमारच्या हातात मशाल आहे तर जॅकलिनच्या हातात  टॉच आहे. सत्यदेव त्यांच्या शेजारी उभा राहून टक लावून पाहत आहेत. या पोस्टरमधली एक गोष्ट नेटकऱ्यांना नेमकी खटकली. मुळात जॅकलिनच्या हातात पेटती टॉर्च असताना अक्षयने मशाल का पेटवावी? असा प्रश्न अनेकांना पडला. ट्विटरवर याची भलतीच चर्चा रंगली.

अनेकांनी हे पोस्टर ‘कॉपी’ असल्याचा दावाही केला. ‘रामसेतू’चं पोस्टर पाहून नेटकऱ्यांना ‘National Treasur’ या चित्रपटाच्या पोस्टरची आठवण झाली. यावरूनही ट्विटरवर कमेंट्स पूर आला.

अक्षयचा ‘रामसेतू’ हा चित्रपट यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. चित्रपटगृहांत रिलीज केल्यानंतर हा सिनेमा अ‍ॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाणार आहे. या चित्रपटात अक्षय एका पुरातत्त्वज्ञाचे पात्र साकारताना दिसणार आहे.

राम सेतू व्यतिरिक्त अक्षय कुमारचे अनेक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. रक्षाबंधन,पृथ्वीराज आणि मिशन सिंड्रेला हे अक्षयचे आगामी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत. कोरोनामुळे या चित्रपटांना काहीसा ब्रेक लागला होता. मात्र, आता पुन्हा एकदा ते बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला सज्ज झाले आहेत.

Web Title: Akshay Kumar Ram Setu First Look Poster Big Mistake Pointed By Fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.