अक्षय कुमारने कॅटरिना कैफचे इन्स्टाग्रामवर केले ‘वेलकम’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2017 15:26 IST2017-04-28T09:54:13+5:302017-04-28T15:26:12+5:30

‘बॉलिवूडचा खिलाडी’ अक्षय कुमार आणि ‘बार्बी डॉल’ कॅटरिना कैफ यांचा ‘वेलकम’ चित्रपट आठवतोय ना? धम्माल, मस्ती, कॉमेडी यांचा मसाला ...

Akshay Kumar performs 'Welcome' on Katarina Kaif's Instagram | अक्षय कुमारने कॅटरिना कैफचे इन्स्टाग्रामवर केले ‘वेलकम’

अक्षय कुमारने कॅटरिना कैफचे इन्स्टाग्रामवर केले ‘वेलकम’

ॉलिवूडचा खिलाडी’ अक्षय कुमार आणि ‘बार्बी डॉल’ कॅटरिना कैफ यांचा ‘वेलकम’ चित्रपट आठवतोय ना? धम्माल, मस्ती, कॉमेडी यांचा मसाला असलेल्या चित्रपटामुळे अक्षय-कॅटरिना यांची जोडी प्रेक्षकांसमोर नव्या रूपात आली. मात्र, तुम्ही विचार कराल की, त्याचा आता काय संबंध? तर संबंध आहे, तो असा की, कॅटरिना कैफ ही अलीकडेच इन्स्टाग्रामवर अ‍ॅक्टिव्ह झाली आहे. तिचे विविध फोटो ती आता तिच्या अकाऊंटवर अपलोड करताना दिसते आहे. त्यामुळे तिचा समर्थक आणि मित्र अक्षय कुमार तिचे ‘वेलकम’ करायला कसे काय विसरू शकतो? त्याने तिच्यासाठी एक फनी मेसेज पोस्ट केला आहे. यात तो तिला म्हणतो,‘ इन्स्टाग्रामवर येणाऱ्या  बॉलिवूडमधील सर्वांत शेवटच्या सदस्याचे मी स्वागत करतो. गम्मत करतोय...पण तुला खुप खुप प्रेमाच्या शुभेच्छा...!’ 

कॅटरिना कैफ ही अशी सेलिब्रिटी आहे जी खुप दिवसांपासून सोशल नेटवर्किंग साईटपासून खुप लांब आहे. तिने अशातच फेसबुकवर एक टेस्ट दिली. जेव्हा तिला वाटले की, आपण इन्स्टाग्रामवर देखील अ‍ॅक्टिव्ह व्हायला पाहिजे. तिला बी टाऊनचे तिचे सर्व सेलिब्रिटी मित्र शुभेच्छा देत आहेत. त्यामुळे कॅट सध्या जाम खुश आहे. 

अक्षय कुमार सध्या त्याच्या शुटिंगच्या  शेडयूलमध्ये बिझी आहे. तो त्याचा आगामी चित्रपट ‘पद्मन’ चे शूटींग करतो आहे. ज्यात त्याच्यासोबत सोनम कपूर आणि राधिका आपटे या दोन अभिनेत्री दिसतील. 


 

Web Title: Akshay Kumar performs 'Welcome' on Katarina Kaif's Instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.