अक्षय कुमार बनणार छोट्या पडद्यावरचा ‘जज’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2017 14:54 IST2017-07-03T09:24:48+5:302017-07-03T14:54:48+5:30
छोट्या पडद्यावर बडे स्टार्स, हे आता अगदी कॉमन झालेय. पण मोठ्या पडद्याच्या या स्टार्सला छोट्या पडद्यावर आणण्यासाठी शोमेकर्सला बरीच ...
.jpg)
अक्षय कुमार बनणार छोट्या पडद्यावरचा ‘जज’!
छ ट्या पडद्यावर बडे स्टार्स, हे आता अगदी कॉमन झालेय. पण मोठ्या पडद्याच्या या स्टार्सला छोट्या पडद्यावर आणण्यासाठी शोमेकर्सला बरीच मोठी किंमत चुकवावी लागते. आता ताजी बातमी सांगायची तर अक्षय कुमारची सांगता येईल. होय, अक्षय कुमार पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परततो आहे. एका रिअॅलिटी शोचा जज म्हणून तो दिसणार आहे. या शोसाठी अक्षयने होकार दिल्याचे कळतेय. आता या शोसाठी अक्षयने किती फीस घेतली, हेही तुम्हाला सांगायलाच हवे. तर 2 ते अडीच कोटी प्रति एपिसोड!
यापूर्वी ‘मास्टर शेफ’ आणि ‘खतरों के खिलाडी’च्या प्रत्येक एपिसोडसाठी अक्षयने १.५ कोटी रुपए घेतले होते. आता ‘द इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या नव्या रिअॅलिटी शोसाठी अक्षयने प्रत्येक एपिसोडसाठी दोन ते अडीच कोटी रुपए मागितले असल्याचे कळतेय. अक्षय कुमारचा कॉमिक टायमिंग अगदी परफेक्ट आहे. लोकांना हसवण्यात तो अगदी तरबेज आहे. अनेक कॉमेडी चित्रपटांतून त्याने लोकांना हसवले आहे. आता अक्षय छोट्या पडद्यावरही लोकांना हसवताना दिसणार आहे.
सध्या अक्षय ‘गोल्ड’ या चित्रपटात बिझी आहे. अक्षय कुमार या चित्रपटात हॉकी कोच बलबीर सिंग यांच्या भूमिकेत दिसणार आहे. बलबीर सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी टीम आॅलम्पिंकमध्ये तीन वेळा गोल्ड मेडल जिंकली होती. बलबीर सिंग यांना हॉकीमध्ये गोलचे उस्ताद मानले जाते. 15 आॅगस्ट 2018 ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय अक्षयचा ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यात भूमी पेडणेकर अक्षयच्या अपोझिट दिसणार आहे.