अक्षयकुमार बनला मुंबई महानगरपालिकेचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2017 02:45 PM2017-07-25T14:45:38+5:302017-07-26T09:31:58+5:30

अक्षयकुमारच्या चाहत्यांसाठी आम्ही एक मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. होय, अक्षयकुमार आशियातील सर्वांत मोठ्या मुंबई महानगरपालिकेचा ब्रॅण्ड ...

Akshay Kumar becomes brand ambassador of Mumbai Municipal Corporation !! | अक्षयकुमार बनला मुंबई महानगरपालिकेचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर!!

अक्षयकुमार बनला मुंबई महानगरपालिकेचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर!!

googlenewsNext
्षयकुमारच्या चाहत्यांसाठी आम्ही एक मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. होय, अक्षयकुमार आशियातील सर्वांत मोठ्या मुंबई महानगरपालिकेचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर बनला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून अभिनेता अक्षयकुमार सामाजिक विषयाला अनुसरून चित्रपट बनवित आहे. शिवाय त्याच्यातील देशभक्ती तो वेळोवेळी दाखवूनही देत आहे. त्याच्या याच चांगल्या कामाचा परिपाक म्हणून त्याची मुंबई महानगरपालिकेच्या ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडरपदी निवड केली आहे. 

आता अक्षय महापालिकेच्या साथीने मुंबईतील रस्ते, नाले आणि छोट्या महानगरातील अडचणींविषयी मुंबईकरांना दिलासा देणार आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या चांगल्या कामांची जनजागृतीही करणार आहे. वास्तविक अक्षय सध्या मुंबईत नसून यूकेला आहे. अक्षय त्याठिकाणी त्याच्या आगामी ‘गोल्ड’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात अक्षय एका अ‍ॅथलेटिक्सच्या भूमिकेत बघावयास मिळणार आहे. त्याचबरोबर ‘टॉयलेट-एक प्रेमकथा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्येही तो सध्या व्यस्त आहे. 

गेल्या काही दिवसांमधील अक्षयने केलेल्या चित्रपटांचा आढावा घेतल्यास हे सर्व चित्रपट समाज आणि देशसेवेशी संबंधित आहेत. त्याचबरोबर समाजाशी निगडीत नेहमीच अक्षय काम करताना चर्चेत असतो. कदाचित याच कारणाने बीएमसीने त्याची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली असावी. अक्षयचा आगामी ‘टॉयलेट-एक प्रेमकथा’ हा चित्रपटदेखील शौचालयाच्या मुद्द्यावर अवलंबून आहे. हा चित्रपट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानाअंतर्गत बनविण्यात आला आहे.

चित्रपटात तो घरात शौचालय बनविण्यासाठी समाजाशी लढा देतो. केवळ घरातच नव्हे तर संपूर्ण गावात शौचालय बनविण्यासाठी तो प्रयत्न करतो. अर्थात अखेरीस त्याला यामध्ये यशही येते. हा चित्रपट रिलीजपूर्वीच आॅनलाइन लिक झाल्याची चर्चा आहे. जेव्हा ही बाब अक्षयला कळाली होती, तेव्हा तो नाराज झाल्याचेही समजते. त्याचबरोबर त्याने पायरेसी विरोधात सर्वांनी लढा देण्याची गरज असल्याचेही म्हटले होते. 

Web Title: Akshay Kumar becomes brand ambassador of Mumbai Municipal Corporation !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.