बहने देती है 100 % रिटर्न्स...! रक्षाबंधनाला अक्षय कुमारने दिले बिग सरप्राईज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 03:54 PM2020-08-03T15:54:34+5:302020-08-03T15:57:17+5:30

अक्षय कुमारची सख्खी बहीण ‘रक्षाबंधन’च्या निमित्ताने चित्रपट क्षेत्रात येत आहे.

akshay kumar announces raksha bandhan on rakhi anand l rai to direct | बहने देती है 100 % रिटर्न्स...! रक्षाबंधनाला अक्षय कुमारने दिले बिग सरप्राईज

बहने देती है 100 % रिटर्न्स...! रक्षाबंधनाला अक्षय कुमारने दिले बिग सरप्राईज

googlenewsNext
ठळक मुद्देराष्ट्रीय पुरस्कार विजेता हिमांशू शर्माने या सिनेमाची कथा लिहिलेली आहे.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याचे अनेक चित्रपट येत्या काळात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आता अक्षयच्या आणखी एका नव्या सिनेमाची घोषणा झालीये. आज रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर अक्षयने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली. शिवाय चित्रपटाचा फर्स्ट लूकही शेअर केला. ‘रक्षाबंधन’ असे या सिनेमाचे नाव आहे. 
अक्षयने त्याचा हा आगामी सिनेमा सख्खी  बहीण अलकाला समर्पित केला आहे. पुढील वर्षी 5 नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज होईल. आनंद एल राय या सिनेमाचे दिग्दर्शक असतील.


 ‘माझ्या अख्ख्या करिअरमध्ये पहिल्यांदाच मी एतक्या झटक्यात एखादी फिल्म साइन केली असेल. इतकी भावुक करणारी सिनेमाची गोष्ट मी पहिल्यांदाच ऐकली. माझ्या बहिणीबरोबर अलकाबरोबर असलेल्या स्पेशल नात्याची ही भेट सादर करायला मला खूप आनंद होतोय. आनंद राय यांना यासाठी खूप धन्यवाद,’ असे या सिनेमाचे पोस्टर शेअर करताना अक्षयने लिहिले आहे. विशेष म्हणजे, अक्षयची बहीण अलका हा सिनेमा प्रोड्यूस करतेय.

अक्षयच्या या आगामी सिनेमाचे शीर्षक आणि पोस्टर बघता, तो भाऊ-बहिणींच्या नात्याची, प्रेमाची गोष्ट असेल हे स्पष्ट होतेय. ‘बहने देती है 100 % रिटर्न्स’ अशी या सिनेमाची टॅगलाइन आहे. पोस्टरमध्ये अक्षय चार बहिणींना बिलगलेला दिसतोय.
राष्ट्रीय पुरस्कार विजेता हिमांशू शर्माने या सिनेमाची कथा लिहिलेली आहे. यापूर्वी हिमांशूने जीरो, रांझणा, तनु वेड्स मनू अशा हिट सिनेमांच्या पटकथा लिहिल्या आहेत. सिनेमात अक्षय लीड रोलमध्ये आहेत. अन्य स्टार कास्टची नावे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहेत.
  
  

Web Title: akshay kumar announces raksha bandhan on rakhi anand l rai to direct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.