अक्षय कुमार आणि रजनीकांत यांच्यात सगळे अलबेल ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 10:50 IST2017-10-24T05:20:37+5:302017-10-24T10:50:37+5:30

काही दिवसांपूर्वी मीडियामध्ये अशी बातमी होती की अक्षय आणि राजनीकांत यांचे एकमेकांशी काहीतरी बिनसलं आहे. त्यामुळे अक्षय कुमार चित्रपट ...

Akshay Kumar and Rajinikanth are all in the dungeon? | अक्षय कुमार आणि रजनीकांत यांच्यात सगळे अलबेल ?

अक्षय कुमार आणि रजनीकांत यांच्यात सगळे अलबेल ?

ही दिवसांपूर्वी मीडियामध्ये अशी बातमी होती की अक्षय आणि राजनीकांत यांचे एकमेकांशी काहीतरी बिनसलं आहे. त्यामुळे अक्षय कुमार चित्रपट २.० च्या म्युझिक लाँचच्या वेळेस अनुपस्थित राहायचा विचार करतोय पण सूत्रांच्या म्हणण्यानुसार ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. सुपरस्टार राजनीकांत आणि खिलाडी अक्षय कुमार या दोघांमध्ये असे काहीही घडले नाहीय. तसेच ते  दोघे एकमेकांचा भरपूर आदर करतात आणि याउलट ते दोघे म्युझिक लाँचच्या वेळेस दमदार एन्ट्री करण्याची प्लानिंग करतायेत.

चित्रपटाशी संबंधित असलेल्या सूत्रांनी या बातमीबद्दल बोलताना म्हटले की दोन्ही कलाकार एकमेकांच्या गुणांचा आदर करतात. या चित्रपटात दोन मोठे कलाकार काम करत आहे त्यामुळे लोकांना असे वाटते की या दोघांमध्ये काही ना काही वाद विवाद होतच असेल आणि काही लोकांची अशी ही इच्छा आहे की चित्रपट २.० ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू नये म्हणून अश्या अफवा पसरवल्या जात आहेत.

बातमीनुसार शूटिंगच्या वेळेस अक्षय आणि राजनीकांतचे एकमेकांसोबत चांगले ट्यूनिंग जमले होते. रजनीकांत आणि अक्षयने एक्शन आणि डान्सचे शूट भरपूर एन्जॉय केले. सेटवर दोघांनी खूप मस्ती करत असत किंवा कोणा ना कोणाची फिरकी घेत असत. त्यांना जे पण सिन दिले जायचे ते दोघे वेळेत पूर्ण करायचे. दोघे आपल्या कामात एवढे मग्न असायचे की त्यांना वाद विवादला करायला वेळच नव्हता. ते त्यांचे काम अधिकाधिक चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करायचे. अक्षला आपला मेकअप करण्यासाठी तब्बल 5 तास लागायचे. यात रजनीकांत एका वैज्ञानिकाच्या आणि रोबोटच्या दुहेरी भूमिकेत बघावयास मिळणार आहे. त्याचबरोबर एमी जॅक्सन, सुधांशू पांडे आणि आदिल हुसेन यांच्याही सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपट २.०चा म्युझिक लाँच लवकरच  दुबईमध्ये होणार असून हा चित्रपट जानेवारी २०१८ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात आपल्याला भरपूर स्टंट बघायला मिळणार आहेत. 

ALSO READ :  SEE PIC: ‘रोबोट २.0’मधील रजनीकांत, एमी जॅक्शनचे फोटो लिक!

Web Title: Akshay Kumar and Rajinikanth are all in the dungeon?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.