अक्षयकुमार बनला चक्क आॅटोरिक्षा ड्रायव्हर; पण त्याने कोणाला बरं सैर घडविली असेल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2018 18:24 IST2018-03-25T12:54:09+5:302018-03-25T18:24:19+5:30
बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार चक्क आॅटोरिक्षा ड्रायव्हर बनला आहे. त्याचे काही फोटोजही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परंतु रिक्षाच्या मागच्या सीटवर बसलेली ती व्यक्ती कोण?

अक्षयकुमार बनला चक्क आॅटोरिक्षा ड्रायव्हर; पण त्याने कोणाला बरं सैर घडविली असेल?
ब लिवूडमध्ये सर्वाधिक व्यस्त अभिनेत्यांमध्ये नाव असलेल्या अक्षयकुमारचे वर्षभरात दोन किंवा तीन चित्रपट प्रदर्शित होत असतात. सध्या तो ‘गोल्ड’ आणि ‘२.०’ यांसारख्या चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. मात्र अशातही तो आपल्या परिवाराला अधिकाधिक वेळ देताना दिसत आहे. वास्तविक अक्षयकुमार कितीही व्यस्त वेळापत्रक असले तरी, आपल्या परिवाराला वेळ देणे पसंत करतो. रविवारी अक्षयकुमार पत्नी ट्विंकल खन्नासाठी चक्क ड्रायव्हर बनला होता. मात्र यावेळी त्याने आलिशान कारमध्ये ड्रायव्हिंग केली नाही तर ट्विंकलला त्याने चक्क आॅटो रिक्षामध्ये फेरफटका मारला. याबाबतची माहिती स्वत: ट्विंकलनेच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या माध्यमातून दिली.
ड्रायव्हर बनलेल्या पती अक्षयकुमारसोबत आॅटो रिक्षाच्या मागच्या सीटवर बसून ट्विंकलने ही राइड खूप एन्जॉय केली. याबाबतचे फोटो शेअर करताना ट्विंकलने सांगितले की, मी सकाळी चार वाजता उठली, अडीच तास लेख लिहिला. आपल्या पाळीव कुत्रांना बाहेर फिरवून आणले अन् त्यानंतर मी या रिक्षा ड्रायव्हरसोबत फिरली. हे सर्व काही मी ४ ते ९ वाजेदरम्यानच केले.
दरम्यान, ट्विंकल आणि अक्षयने २००१ मध्ये लग्न केले. सध्या या दाम्पत्याला आरव नावाचा मुलगा आणि नितारा नावाची मुलगी आहे. परिवार आणि मुलांच्या पालनपोषणासाठी तिने अभिनयापासून चार हात लांब राहणे पसंत केले. ट्विंकल सध्या आपल्या लेखनाबरोबरच चित्रपट निर्मितीवरही काम करीत आहे. अक्षयकुमारचा अखेरचा ‘पॅडमॅन’ हा चित्रपट तिनेच प्रोड्युस केला.