अक्षयकुमारला पत्नी ट्विंकल ‘या’ कारणामुळे रोजच मारायची टोमणे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2017 21:54 IST2017-08-06T16:24:19+5:302017-08-06T21:54:19+5:30

गेल्या २५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून खिलाडी अक्षयकुमार बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान टिकवून आहे. खरं तर बॉलिवूडमध्ये अक्षयचा कोणी गॉडफादर नाही, ...

Akikumamala wife twinkle 'This reason' to kill every day! | अक्षयकुमारला पत्नी ट्विंकल ‘या’ कारणामुळे रोजच मारायची टोमणे!

अक्षयकुमारला पत्नी ट्विंकल ‘या’ कारणामुळे रोजच मारायची टोमणे!

ल्या २५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून खिलाडी अक्षयकुमार बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान टिकवून आहे. खरं तर बॉलिवूडमध्ये अक्षयचा कोणी गॉडफादर नाही, अशात मेहनतीच्या जोरावर त्याने चाहत्यांना आपलेसे केले आहे. त्यामुळे आजही अक्षयचा चित्रपट बॉक्स आॅफिसवर सुपरहिट ठरत आहे. मात्र त्याच्या या प्रवासात एका गोष्टीची त्याला सातत्याने उणीव जाणवत होती, अर्थात ती उणीव गेल्या काही दिवसांपूर्वी पूर्णही झाली. आम्ही कशाविषयी सांगत आहोत हे कदाचित तुमच्या लक्षात आले असेल. होय, अक्षयला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराविषयी आम्ही सांगत आहोत. ६४व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अक्षयला त्याच्या ‘रुस्तम’ या चित्रपटासाठी सर्वश्रेष्ठ अभिनेत्याच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. अर्थात त्यावेळी हा पुरस्कार वादग्रस्त ठरला होता. आता पुन्हा हा विषय काढण्यामागचे कारण अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना आहे.

होय, अक्षयने एका इव्हेंटदरम्यान एक खळबळजनक खुलासा करताना सांगितले की, ‘राष्ट्रीय पुरस्कार मिळण्याअगोदर ट्विंकल मला दिवस-रात्र टोमणे मारत होती. माझ्या परिवारात सगळ्यांना सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केले, परंतु तुला एकही पुरस्कार मिळालेला नाही, असे ट्विंकल मला नेहमीच बोलत असे. परंतु राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर तिचे टोमणे बंद झाले आहे.’ अक्षयचा हा खुलासा पुरस्कार मिळण्याअगोदरचा त्रास सांगणारा आहे, असेच म्हणावे लागेल.



दरम्यान, जेव्हा अक्षय हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेला होता, तेव्हा पत्नी ट्विंकल आणि मुलगा आरव सोबत होते. सगळ्यांच्याच चेहºयावरील आनंद बघण्यासारखा होता. मात्र काल झालेल्या एका इव्हेंटदरम्यान अक्षयने केलेल्या खुलाशानंतर सगळ्यांनाच धक्का बसला. जेव्हा ६४व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली तेव्हा अक्षयच्या पुरस्काराला अनेकांनी विरोध केला. अनेकांच्या मते अक्षयला मिळालेला हा पुरस्कार मॅनेज होता; वाढता विरोध बघता अक्षयनेही पुरस्कार देऊ नका, अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिली होती. 

सध्या अक्षय त्याच्या आगामी ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटात त्याच्या अपोझिट भूमी पेडनेकर प्रमुख भूमिकेत आहे. काही दिवसांपूर्वीच तो लखनऊ येथे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेला असता, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबरोबर त्याने स्वच्छतेची शपथ घेतली होती. 

Web Title: Akikumamala wife twinkle 'This reason' to kill every day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.