अजय देवगणच्या ‘या’ फोटोवर काजोलनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; यूजर्सनी म्हटले, ‘वहिनीने चांगली पक्कड निर्माण केली’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2018 16:14 IST2018-05-24T09:43:55+5:302018-05-24T16:14:52+5:30

बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी आणि ‘इश्क’ या चित्रपटानंतर लग्नाच्या बंधनात अडकलेले अभिनेता अजय देवगण आणि त्याची पत्नी काजोल सध्या सोशल ...

Ajay Devgn's 'photo' gave Kajolini a 'only' reaction; The user said, 'The bride made a good face' | अजय देवगणच्या ‘या’ फोटोवर काजोलनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; यूजर्सनी म्हटले, ‘वहिनीने चांगली पक्कड निर्माण केली’

अजय देवगणच्या ‘या’ फोटोवर काजोलनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; यूजर्सनी म्हटले, ‘वहिनीने चांगली पक्कड निर्माण केली’

लिवूडची प्रसिद्ध जोडी आणि ‘इश्क’ या चित्रपटानंतर लग्नाच्या बंधनात अडकलेले अभिनेता अजय देवगण आणि त्याची पत्नी काजोल सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चिले जात आहेत. हे दोघेही सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असून, दर दिवसाला त्यांचा एक तरी फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करीत असतात. यावेळेस अजयने असाच काहीसा एक फोटो इन्स्टावर शेअर केला. ज्यामुळे त्याची पत्नी काजोलने त्याची चांगलीच फिरकी घेतली. अजयने शेअर केलेल्या फोटोवरून हे दिसून येते की, त्याच्या पायाला खूप वेदना होत असाव्यात. त्यासाठीच तो डॉक्टरकडे गेला असावा. 

या फोटोमध्ये क्लिनिक पोहोचलेला अजय देवगण बेडवर झोपलेला आहे आणि डॉक्टर त्याच्या उजवा पाय उचलून त्याला तपासत आहेत. वास्तविक हा फोटो खूपच सिम्पल आहे. परंतु त्याची पत्नी काजोलने या फोटोवर एक अशी कॉमेण्ट पोस्ट केली ज्यामुळे हा फोटो आता फनी दिसत आहे. काजोलने अजयने शेअर केलेल्या फोटोला कॉमेण्ट दिली की, ‘ते तर खरोखरच तुझी टांग खिचत आहेत.’  काजोलच्या या कॉमेण्टनंतर अजयचा हा फोटो सर्वत्र ट्रोल होत आहे. कारण काजोलच्या या कॉमेण्टनंतर अन्य यूजर्सही काजोलच्या सपोर्टमध्ये बोलताना दिसत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘काजोल वहिणीने चांगलीच पकड निर्माण केली... भावावर @अजय देवगण!’


दरम्यान, काजोल आणि अजयची जोडी लोकांना नेहमीच पसंत आली आहे. २०१५ मध्ये आलेल्या ‘दिलवाले’मध्ये काजोलने बºयाच काळानंतर मोठ्या स्क्रिनवर कमबॅक केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या सुपरहिट चित्रपटाचा नायक शाहरूख खान होता. सध्या काजोल तिच्या आगामी ‘ईला’ या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली जाणार आहे. दुसरीकडे अजय देवगणच्या ‘रेड’ने बॉक्स आॅफिसवर धूम उडवून दिल्यानंतर तो त्याच्या पुढील प्रोजेक्टमध्ये व्यस्त झाला आहे. अजयच्या रेडने बॉक्स आॅफिसवर शंभर कोटी रूपयांचा गल्ला जमविला होता. 

Web Title: Ajay Devgn's 'photo' gave Kajolini a 'only' reaction; The user said, 'The bride made a good face'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.