/>अजय देवगनच्या ‘शिवाय’ या चित्रपटाची शुटींग पूर्ण झाली आहे. व त्याचा ट्रेलर हा ७ आॅगस्टला इंदोरमध्ये प्रदर्शित होत आहे. अक्षय कुमारच्या ‘रुस्तम’ या चित्रपटाबरोबर प्रेक्षकांना तो चित्रपटगृहात पाहता येईल. शिवाय या चित्रपटाच्या ट्रेलरची फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठी उत्सुकता आहे. ही उत्सकुता वाढविण्यासाठी रोमांचक पोस्टरचेही योगदान आहे. अजय देवगनलाही या ट्रेलरमुळे खूप आत्मविश्वास आहे. कारण की, त्याची मुलगी नीसाला शिवायचा ट्रेलर खूप आवडला आहे. सूत्रांनी सांगितले की, त्याने आपल्या कुटुंबाची यासंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेतली. नीसाचा ग्रीन सिंग्नल मिळाल्याने अजयचा आत्मविश्वास वाढला आहे. आॅक्टोबर महिन्यात दिवाळीला शिवाय प्रदर्शित होत आहे. अजयचा हा दुसरा दिग्दर्शन केलेला चित्रपट आहे.