Tanhaji Movie Trailer : न चुकता पाहा, ‘तानाजी’चा दमदार ट्रेलर!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 15:04 IST2019-11-19T15:04:05+5:302019-11-19T15:04:55+5:30
Tanhaji : The Unsung Warrior Movie Trailer : अजय देवगण, सैफ अली खान, काजोल स्टारर ‘तानाजी- द अनसंग वॉरियर’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय.

Tanhaji Movie Trailer : न चुकता पाहा, ‘तानाजी’चा दमदार ट्रेलर!!
अजय देवगण, सैफ अली खान, काजोल स्टारर ‘तानाजी- द अनसंग वॉरियर’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. तानाजी मालुसरे या मावळ्याच्या पराक्रमाची कथा सांगणा-या या चित्रपटाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील अजय देवगण, सैफ अली खान यांचा फर्स्ट लूक समोर आला होता. काही क्षणांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झला.
3 मिनिटे 21 सेकंंदाच्या या ट्रेलरमधील दमदार संवाद, कलाकारांचा अभिनय, भव्यदिव्य सेट, युद्धाचे प्रसंग लक्ष वेधून घेतात.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. निष्ठावान मावळ्यांनी त्यांना भक्कम साथ दिली. याच मावळ्यांपैकी एक म्हणजे सुभेदार तानाजी मालसुरे. मुलाचे लग्न बाजूला ठेवून शिवरायांच्या एका शब्दाखातर युद्धासाठी सज्ज झालेल्या तानाजींच्या रूपात मराठ्यांचा इतिहास या चित्रपटातून उलगडणार आहे. अजय देवगण या चित्रपटात तानाजींची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. तर काजोल तान्हाजी मालुसरे यांची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका साकारणार आहे. अभिनेता सैफ अली खान राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर मराठमोळा अभिनेता शरद केळकर शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. पुढील वर्षी 10 जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.