अजय देवगणच्या 'मैदान'चं तिकिट झालंय खुपच स्वस्त! दोन दिवस खास ऑफर, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 11:32 AM2024-04-15T11:32:52+5:302024-04-15T11:33:40+5:30

अजय देवगणच्या 'मैदान' सिनेमा पाहण्यासाठी आज आणि उद्या तुम्हाला खास ऑफर दिली आहे. त्यामुळे तुम्ही स्वस्तात सिनेमा बघू शकता (maidaan, ajay devgn)

Ajay Devgn Maidaan ticket is very cheap Special offer for two days read details | अजय देवगणच्या 'मैदान'चं तिकिट झालंय खुपच स्वस्त! दोन दिवस खास ऑफर, वाचा सविस्तर

अजय देवगणच्या 'मैदान'चं तिकिट झालंय खुपच स्वस्त! दोन दिवस खास ऑफर, वाचा सविस्तर

अजय देवगणचा 'मैदान' सिनेमा रिलीज होऊन आता पाच दिवस उलटून गेलेत. 'मैदान' ने २० कोटीहून जास्त गल्ला जमावला आहे. भारतीय फुटबॉलचा सुवर्णकाळ 'मैदान'च्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर बघायला मिळतोय. अशातच 'मैदान' सिनेमा पाहायला जास्तीत जास्त प्रेक्षक सिनेमागृहांमध्ये यावे म्हणून सिनेमाच्या निर्मात्यांनी प्रेक्षकांसाठी खास ऑफर ठेवली आहे.

'मैदान' सिनेमा आज आणि उद्या तुम्ही फक्त १५० रुपयांत बघू शकता. ही ऑफर फक्त आज आणि उद्या म्हणजेच १५ आणि १६ एप्रिलपर्यंतच लागू आहे. जवळपास सर्व चित्रपटगृहांत ही ऑफर लागू आहे. त्यामुळे अजय देवगणचा सध्या गाजत असलेला 'मैदान' पाहायची इच्छा असेल तर तुम्ही सिनेमागृहांत जरुर या ऑफरचा लाभ घेत सिनेमा पाहू शकता. इतर दिवशी 'मैदान'चं तिकिट २०० रुपयांच्या वर आहे. त्यामुळे या ऑफरचा वापर करुन तुम्ही 'मैदान' १५० रुपयांत बघू शकता.

'मैदान'बद्दल सांगायचं तर, फुटबॉल प्रशिक्षक सय्यद रहीम यांच्या संघर्षाची कथा सांगणारा 'मैदान' सिनेमाला गेल्या चार वर्षांपासून मुहुर्त मिळत नव्हता. अखेर ईदच्या मुहुर्तावर हा सिनेमा गुरूवारी प्रदर्शित करण्यात आला. अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला हा सिनेमा प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. 'मैदान'ला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाचं पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.

Web Title: Ajay Devgn Maidaan ticket is very cheap Special offer for two days read details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.