कोरोना व्हायरसच्या कचाट्यात सापडला अजय देवगण, 350 लोकांची टीम सेटवर होती तयार पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 12:57 PM2020-03-18T12:57:50+5:302020-03-18T13:01:45+5:30

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे.

Ajay devgn bhuj the pride of india shooting cancelled due to corona outbreak gda | कोरोना व्हायरसच्या कचाट्यात सापडला अजय देवगण, 350 लोकांची टीम सेटवर होती तयार पण...

कोरोना व्हायरसच्या कचाट्यात सापडला अजय देवगण, 350 लोकांची टीम सेटवर होती तयार पण...

googlenewsNext

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. देशात कोरोना व्हायरस झालेल्या रुग्णांची संख्या 140 वर पोहोचली आहे. कोरोनाचा फटका सर्वसामान्य नागरिक ते बॉलिवूड सेलिब्रेटीपर्यंत सगळ्यांचा बसला आहे. महाराष्ट्र सरकारने 31 मार्चपर्यंत फिल्मसिटीमधील सगळे स्टुडिओ बंद केले आहेत. परिणामी सलमान खानचा राधे, आलिया भटचा गंगूबाई काठियावाडी आणि करण जोहरचा तख्त सिनेमाचे शूटिंग सध्या बंद ठेवण्यात आले आहे. फिल्मीबिटच्या रिपोर्टनुसार अजय देवगण 'भुज द प्राईड ऑफ इंडिया'चे शूटिंगसाठी फिल्मसिटीमध्ये गेला होता मात्र तिथून त्याला परतावे लागले. अजय सोबत 350 कर्मचाऱ्यांनादेखील सेटवरून परत पाठवण्यात आले.    

रिपोर्टनुसार, अजय देवगण सिनेमातील महत्त्वाचे सीक्वेंस शूट केले जाणार होता. त्यामुळे सिनेमाची मोठी टीम सेटवर उपस्थित होता. मात्र कोरोनामुळे शूटिग कॅन्सल करावे लागेल.  

अभिषेक दुधिया दिग्दर्शित हा चित्रपट २०२० मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट १९७१ च्या भारत-पाक युद्धादरम्यान भूज विमान तळाचे प्रभारी स्क्वॉड्रन लीडर विजय कर्णिक यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे.१९७१ च्या भारत-पाक युद्धादरम्यान विजय कर्णिक भूज विमानतळावर तैनात होते. पाकी हवाई हल्ल्यात भूज तळावरची धावपट्टी ध्वस्त झाली होती. ही धावपट्टी पुन्हा उभारणे गरजेचे होते. अशावेळी विजय कर्णिक यांनी धाडसी निर्णय घेत, बाजूच्या गावातील महिलांच्या मदतीने ही धावपट्टी उभारली होती. भारत-पाक युद्धात या धावपट्टीचे योगदान महत्त्वाचे राहिले आणि पयार्याने ही धावपट्टी नव्याने उभारणारे विजय कर्णिक यांचे योगदानही अनन्यसाधारण ठरले.

Web Title: Ajay devgn bhuj the pride of india shooting cancelled due to corona outbreak gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.