अजय देवगणने ‘या’ अभिनेत्रीची केली अशी मस्करी की तिच्या डोळ्यात आले अश्रू !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 16:58 IST2018-03-31T11:27:54+5:302018-03-31T16:58:04+5:30
बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण याला त्याच्या अभिनयासाठी जेवढे ओळखले जाते तेवढेच त्याच्या धीरगंभीर स्वभावासाठी तो ओळखून आहे. खरं तर ...
.jpg)
अजय देवगणने ‘या’ अभिनेत्रीची केली अशी मस्करी की तिच्या डोळ्यात आले अश्रू !
ब लिवूडचा सिंघम अजय देवगण याला त्याच्या अभिनयासाठी जेवढे ओळखले जाते तेवढेच त्याच्या धीरगंभीर स्वभावासाठी तो ओळखून आहे. खरं तर अजयचा स्वभाव समजून घेणे अनेकांना अद्यापपर्यंत जमले नाही. कारण कधी धीरगंभीर, तर कधी तो सेटवर आपल्या को-अॅक्टर्ससोबत अशी काही धमालमस्ती करीत असतो, ज्यामुळे त्याला समजून घेणे उपस्थितांना अवघड होते. याबाबतचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा एका अभिनेत्रीने त्याच्या स्वभावाची पोलखोल केली.
होय, ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणीही नसून दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा आहे. सोनाक्षीने एका शोदरम्यान सांगितले की, ‘पटियाला’ चित्रपटाच्या सेटवर अजयने माझ्याशी खूपच चेष्टामस्करी केली. फिल्म क्रूसोबत जेव्हा आम्ही डिनरला गेलो होतो, तेव्हा अजय माझ्याकरिता एका मोठ्या कटोºयात गाजराचा हलवा घेऊन आला होता. तो मला वारंवार हलव्या टेस्ट करण्यास सांगत होता. वास्तविक मला त्याचे हे वागणे आवडत नव्हते, परंतु अशातही मी एक चमचा हलवा खाल्ला. परंतु जोपर्यंत मला या मागचे खरे कारण कळाले, तोपर्यंत वेळ निघून गेली होती.
![]()
सोनाक्षीने सांगितले की, अजयने मला जो गाजराचा हलवा दिला तो पदार्थ लाल मिर्चिची पेस्ट होती. त्यामुळे माझ्या डोळ्यांना अक्षरश: धारा लागल्या होत्या. सोनाक्षीने सांगितलेला हा किस्सा खरोखरच अजयमधील खोडकरवृत्ती दर्शविणारा आहे. दरम्यान, सोनाक्षी आणि अजयने ‘सन आॅफ सरदार’ आणि ‘अॅक्शन-जॅक्सन’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. अजय सध्या ‘तानाजी-द अनसंग योद्धा’ या चित्रपटाची तयारी करीत आहे. या चित्रपटात तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्याची धुरा सांभाळणारे सुभेदार तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणार आहे.
या व्यतिरिक्त तो एका रोमॅण्टिक चित्रपटावरही काम करीत आहे. त्याचबरोबर त्याचा ‘सन आॅफ सरदार’ या चित्रपटाचा सीक्वेलही सध्या चर्चेत आहे. अजयचा काही दिवसांपूर्वीच ‘रेड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. लवकरच हा चित्रपट शंभर कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळविण्याची शक्यता आहे. राजकुमार गुप्ता यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘रेड’चा दुसरा आठवडा सुरू आहे. आतापर्यंत या चित्रपटाने ९० कोटी ११ लाख रूपयांची कमाई केली आहे.