मुलगी न्यासामुळे झोपेच्या गोळ्या खाऊन झोपतो अजय देवगण; पण का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2017 21:41 IST2017-09-03T16:11:57+5:302017-09-03T21:41:57+5:30

बातमीचे हेडिंग वाचून कदाचित तुमच्या डोक्यात एकच प्रश्न घोंगावत असेल की, बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणच्या लेकीने असे काय केले ...

Ajay Devagan sleeping on sleeping tablets for daughter trust; But why? | मुलगी न्यासामुळे झोपेच्या गोळ्या खाऊन झोपतो अजय देवगण; पण का?

मुलगी न्यासामुळे झोपेच्या गोळ्या खाऊन झोपतो अजय देवगण; पण का?

तमीचे हेडिंग वाचून कदाचित तुमच्या डोक्यात एकच प्रश्न घोंगावत असेल की, बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणच्या लेकीने असे काय केले असेल की, त्याला चक्क झोपेच्या गोळ्या घाव्या लागत आहेत? पण काहीही विचार करण्याअगोदर आम्ही स्पष्ट करतो की, अजयची मुलगी न्यासा हिने असे काहीही केलेले नाही. वास्तविक अजय आणि न्यासाला गेल्या काही दिवसांपासून अशा अवस्थेतून जावे लागत आहे, ज्यामुळे त्याची झोप उडाली होती. याबाबतचा खुलासा खुद्द अजयनेच बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान केला आहे. 

जेव्हा अजयला, मुलीला विदेशात शिक्षणासाठी पाठविल्याने एक बाप म्हणून तुझी कशी अवस्था होत आहे? असे विचारण्यात आले तेव्हा अजयने उत्तर देताना म्हटले की, ‘सध्या मी खूपच अस्वस्थ होत आहे. तिला विदेशात जाऊन काहीच दिवस झाले आहेत, परंतु माझी अक्षरश: झोप उडाली आहे. मी दररोज झोपेच्या गोळ्या घेत आहे. माझ्या चित्रपटाच्या रिलीजनंतर मी तिला भेटण्यासाठी जाणार आहे.’ तर मित्रांनो आपला सिंघम मुलीच्या चिंतेमुळे अस्वस्थ आहे. अर्थात अशीच काहीशी अवस्था न्यासाची आहे. कारण परिवारापासून दूर राहात असल्याने तिला अस्वस्थ वाटत आहे. 



पण काही जरी असले तरी, मुलीच्या चांगल्या आणि उत्कृष्ट शिक्षणासाठी अजयला एवढा त्याग करावाच लागेल. दरम्यान, अजयचा ‘बादशाहो’ हा चित्रपट रिलीज झाला असून, प्रेक्षकांचा त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. दोनच दिवसांत चित्रपटाने २७.६३ कोटी रुपयांचा गल्ला जमविला आहे. ट्रेंडनुसार तिसºया दिवशीही चित्रपट चांगला व्यवसाय करण्याची शक्यता आहे. 

चित्रपटात अजय देवगणचा अंदाज बघण्यासारखा आहे. त्यातच इमरान हाशमी आणि मिलन लूथरियासारख्या अभिनेत्यांची साथ मिळाल्याने त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. तर चित्रपटात रंग आणण्यासाठी अभिनेत्री ईशा गुप्ता, संजय मिश्रा, इलियाना डिक्रूज, विद्युत जामवाला यांनीही पुरेपूर प्रयत्न केला आहे. 

Web Title: Ajay Devagan sleeping on sleeping tablets for daughter trust; But why?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.