अजय-अतूलसोबत पार्श्वगायन करण्याची इच्छा : अंकित तिवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2016 12:59 IST2016-06-23T07:29:54+5:302016-06-23T12:59:54+5:30

सून रहा है ना तू या गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविणारा अंकित तिवारी हा त्याच्या बदतमीज या नवीन अल्बमच्या ...

Ajay-Atul wants to play with: Ankit Tiwari | अजय-अतूलसोबत पार्श्वगायन करण्याची इच्छा : अंकित तिवारी

अजय-अतूलसोबत पार्श्वगायन करण्याची इच्छा : अंकित तिवारी

न रहा है ना तू या गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविणारा अंकित तिवारी हा त्याच्या बदतमीज या नवीन अल्बमच्या प्रमोशनसाठी नुकताच पुण्यात आला होता. त्यावेळी तो म्हणाला, मराठी चित्रपट आता उंचशिखरावर पोहोचू लागले आहेत. त्यांचे हे यश पाहता नक्कीच मराठी पार्श्वगायन करायला आवडेल. त्याचबरोबर अजय-अतूल  एकदम उत्कृष्ट गायक व संगीतकार आहेत. त्यांच्यासोबत पार्श्वगायन करण्याची इच्छा असल्याची अंकितने लोकमत सीएनएक्ससोबत बोलताना व्यक्त केली. 
        आपल्या आयुष्यातील चढउतार सांगताना अंकित म्हणाला, माझी आई देखील सुरेख गायिका होती. पण ती भजन, जागणरण अशा प्रकारचे गाणे गात असे. पण मला बॉलीवुडची ओढ लागली होती. त्यामुळे मुंबई माझे ध्येय होते. त्यासाठी मी खूप स्ट्रगल केला आहे. तसेच आयुष्यात चांगुलपणा हा नेहमी अंगी बाळगला गेला पाहिजे. ती एक जिद्द असली पाहिजे. कारण चांगुलपणाच माणसाला जीवनात यशस्वी करतो. हा कोणता फिल्मी डायलॉग नसून मी स्वत: हे अनुभवलं आहे. कामाबाबतीत नेहमी प्रामाणिक राहिले गेले पाहिजे. मी आयुष्यात नेहमी कोणतही गाणं गाताना माझं पहिलं गाणं म्हणूनच गातो. आणि त्याला शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि सराव करण्यावर माझा विश्वास आहे. कारण चूकातूनच माणूस शिकत असतो.  खरं सागू का ? अकिंत तिवारी पासून जर  म्युझिक बाजूला केले तर अंकित पूर्ण रिकामा आहे. 
       लता मंगेशकर, सोनू निगम, श्रेया घोषाल, अरिजीत सिंग यांसारख्या मोठया गायकामध्ये जागा तयार करायची असेल तर गायकाला स्वत:ची एक ओळख निर्माण करणं महत्वाच असतं.  तसेच सलमान खान व अरिजीत सिंगच्या वादाविषयी विचारते असता, अंकित म्हणाला,सलमानला मी पर्सनली ओळखत नाही. तो खूप चांगला माणूस आहे. चॅरेटी करतो,स्टारडम आहे,दोस्तो के दोस्त, तर अरिजीत बहुत बडा धमाकेदार कलाकार आहे. त्याच्याजवळ छान आवाज आहे. तो खरचं हुशार देखील आहे.  त्याला आतापर्यत जे काय यश मिळालं आहे तो त्यासाठी पात्र आहे.

Web Title: Ajay-Atul wants to play with: Ankit Tiwari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.