मराठी गाण्याच्या रिमेकवर थिरकणं नोराला पडलं महागात; 'ब्रिंग इट ऑन'चा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 12:38 PM2024-03-13T12:38:55+5:302024-03-13T12:39:23+5:30

नोरा फतेही आणि 'ब्रिंग इट ऑन'चं बॉलिवूड व्हर्जन! व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, "मराठी गाण्यांचा..."

ajay atul bring it on song bollywood version netizens troll nora fatehi video | मराठी गाण्याच्या रिमेकवर थिरकणं नोराला पडलं महागात; 'ब्रिंग इट ऑन'चा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

मराठी गाण्याच्या रिमेकवर थिरकणं नोराला पडलं महागात; 'ब्रिंग इट ऑन'चा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

अजय-अतुल गोगावले हे सिनेसृष्टीतील लोकप्रिय गायक आहेत. अनेक सुपरहिट गाणी त्यांनी दिली आहेत. केवळ मराठीतच नाही तर बॉलिवूडमध्येही अजय-अतुल यांनी नाव कमावलं आहे. त्यांच्या अनेक मराठीत हिट ठरलेल्या गाण्यांचे बॉलिवूडमध्येही रिमेकही झाले आहेत. आता 'बेबी ब्रिंग इन ऑन' या अजय-अतुलच्या सुपरहिट गाण्याचा बॉलिवूड रिमेक करण्यात आला आहे. 'मडगाव एक्सप्रेस' या सिनेमातील हे गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. 

'ब्रिंग इट ऑन' या गाण्यात बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही डान्स करताना दिसत आहे. अगदी मराठीप्रमाणेच हे गाणंही शूट करण्यात आलं आहे. ढोल, लेझीम आणि मराठमोळा ठसका या गाण्याला दिलेला पाहायला मिळत आहे. अजय-अतुलनेच या गाण्याला आवाज दिला आहे. अवघ्या काही दिवसांतच या गाण्याला मिलियनमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. पण, हे गाणं प्रेक्षकांना फारसं पसंतीस न उतरल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळतं. या गाण्यावर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

"बॉलिवूडकडे आता काही राहिलेलं नाही. म्हणून मराठी गाणी चोरत आहेत", अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने "हे ठिक आहे...पण ओरिजनलच चांगलं होतं", असं म्हटलं आहे. "काय दिवस आलेत...मराठी गाण्यांचा रिमेक करावा लागत आहे", "मराठी व्हर्जन चांगलं होतं", "चांगल्या गाण्याची वाट लावली", असं म्हणत प्रेक्षकांनी ब्रिंग इन ऑनच्या बॉलिवूडवर रिमेकवर नाराजी व्यक्त केली आहे. 

मराठीतील 'ब्रिंग इन ऑन' हे गाणं जाऊ द्या ना बाळासाहेब या सिनेमातील आहे. या गाण्यात मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर आहे. अजय-अतुलच्या इतर गाण्यांप्रमाणे या गाण्यालाही प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. आजही पार्टी आणि इतर कार्यक्रमात हे गाणं हमखास वाजतं. 

Web Title: ajay atul bring it on song bollywood version netizens troll nora fatehi video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.