​ऐश्वर्याच्या शूटिंगला करावे लागले बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2016 06:35 IST2016-02-14T13:35:44+5:302016-02-14T06:35:44+5:30

टाईमलेस ब्युटी ऐश्वर्या राय-बच्चन सध्या ‘सरबजित’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. एका सीनची शूटिंग अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात करण्यात येत असताना ...

Aishwarya's shooting stopped | ​ऐश्वर्याच्या शूटिंगला करावे लागले बंद

​ऐश्वर्याच्या शूटिंगला करावे लागले बंद

ईमलेस ब्युटी ऐश्वर्या राय-बच्चन सध्या ‘सरबजित’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.

एका सीनची शूटिंग अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात करण्यात येत असताना फिल्म क्रू आणि बाऊन्सरनी केलेल्या गैरवर्तनामुळे शूटिंग थांबवावी लागली.

ऐश्वर्या मंदिरात येणार म्हणून तिला पाहण्यासाठी चाहते आणि मीडियाने मोठी गर्दी केली. तिची एक झलक पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक होते. याचवेळी बाऊन्सर्सने फोटोग्राफर्स आणि चाहत्यांशी धक्काबुक्की केली. त्यांच्या अशा गैरवर्तनामुळे मंदिरातील शूटिंग तात्काळ थांबवावी लागली.

एसजीपीसी अ‍ॅडिशनल सेक्रेटरी दरजित सिंग यांनी माहिती दिली की, ‘आम्हाला वाटले एकदम शांततेत शूटिंग पार पडेल; मात्र सुवर्ण मंदिरासारख्या पवित्र जागेवर असे असभ्य वर्तन मुळीच मान्य नाही.’

दरम्यान, ऐश्वर्या अत्यंत शांत होती. अधूनमधून ती चाहत्यांना हात हालवून अभिवादन करीत होती. 

 

Web Title: Aishwarya's shooting stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.