​उर्वशी झाली ऐश्वर्याच्या पर्पल लिप्सची दीवानी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 18:12 IST2016-08-02T12:42:01+5:302016-08-02T18:12:44+5:30

ऐश्वर्यानंतर कदाचितच कुठली अभिनेत्री पर्पल लिपस्टिक ट्राय करेल, असेच वाटले होते. पण ती आमची चूक होती, असेच म्हणायला हवे. कारण ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ फेम उर्वशी रौतेला हिने ऐश्वर्याचा पर्पल लिपस्टिक ट्रेंड आपलासा केलायं.

Aishwarya's Purple Lips addict! | ​उर्वशी झाली ऐश्वर्याच्या पर्पल लिप्सची दीवानी!

​उर्वशी झाली ऐश्वर्याच्या पर्पल लिप्सची दीवानी!

वर्षीचा कान्स फिल्म फेस्टिवल गाजला होता तो ऐश्वर्या रॉय बच्चन हिच्या पर्पल लिपस्टिकमुळे.  बेज कलरच्या गाऊनमध्ये ऐश्वर्या रेड कार्पेटवर उतरली होती. मात्र कान्समध्ये या गाऊनपेक्षा ऐश्वर्याच्या पर्पल लिपस्टिकनेच सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. सोशल मीडियावर ऐश्वर्याच्या या बोल्ड लिप शेडची चांगलीच टर उडवली गेली होती. हॉरर चित्रपटांपासून नाही, ऐश्वर्याच्या लिप्समुळे अधिक भीती वाटतेंय,  जणू  ऐश्वर्याने रेड कार्पेटवर उतरण्याआधी टोपलीभर जांभळं खाल्ली असावीत,  ऐश्वयार्ने ब्लॅक करेंट आईस्क्रीम खाल्ले असावे,  ऐश्वर्याने आपल्या मुलीचे क्रियॉन ओठांवर लावले असावेत, अशा ऐश्वर्याची खिल्ली उडवणाºया प्रतिक्रिया सोशलमीडियावर उमटल्या होत्या.  यानंतर कदाचितच कुठली अभिनेत्री पर्पल लिपस्टिक ट्राय करेल, असेच तेव्हा वाटले होते. पण ती आमची चूक होती, असेच म्हणायला हवे. कारण ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ फेम उर्वशी रौतेला हिने ऐश्वर्याचा पर्पल लिपस्टिक ट्रेंड आपलासा केलायं. केवळ एवढेच नाही तर ऐश्वर्या आणि स्वत:चा पर्पल लिपस्टिकमधला फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केला. आहे ना डेअरिंग! व्वा, उर्वशी मान गये यार!!

 

Web Title: Aishwarya's Purple Lips addict!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.