ऐश्वर्या रायला करायचे होते फिजिक्स टिचरला इम्प्रेस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 18:27 IST2017-09-29T12:57:08+5:302017-09-29T18:27:08+5:30

कॉलेज दिवसांमध्ये ऐश्वर्या राय फिजिक्स टीचरला इम्प्रेस करू इच्छित होती. कारण ते इतर शिक्षकांच्या तुलनेत खूपच कडक शिस्तीचे होते. ...

Aishwarya wanted to teach physics tweet to Impress! | ऐश्वर्या रायला करायचे होते फिजिक्स टिचरला इम्प्रेस!

ऐश्वर्या रायला करायचे होते फिजिक्स टिचरला इम्प्रेस!

लेज दिवसांमध्ये ऐश्वर्या राय फिजिक्स टीचरला इम्प्रेस करू इच्छित होती. कारण ते इतर शिक्षकांच्या तुलनेत खूपच कडक शिस्तीचे होते. आपल्या ग्रुपसोबत नेहमीच शेवटच्या बाकावर बसणारी ऐश्वर्या फिजिक्सच्या तासामध्ये पहिल्या बेंचवर येऊन बसायची. हा खुलासा तिची क्लासमेंट शिवानी हिने २००७ मध्ये एका इंग्रजी वेबसाइटला मुलाखत देताना केला होता. शिवानीने या मुलाखतीत म्हटले होते की, मी एक वर्षासाठी मुंबईतील जय हिंद महाविद्यालयात विज्ञानाची विद्यार्थ्यांनी होती. ऐश्वर्याने या महाविद्यालयात नंतर प्रवेश घेतला. या अगोदर ती के. सी. कॉलेजमध्ये शिकत होती. के. सी. माझ्या कॉलेजच्या खूपच जवळ होते. माझ्या कॉलेजमधील तरुण ऐश्वर्याच्या सौंदर्यावर फिदा होते. तिला बघण्यासाठी ते नेहमीच गेटवर उभे राहायचे. 

शिवानीने सांगितल्यानुसार, ऐश्वर्या आणि मला दररोज ट्रेनने कॉलेजला जावे लागत असे. तसेच काही अंतर पायी चालावे लागत असे. शिवानीने यावेळी हेदेखील स्पष्ट केले की, ऐश्वर्या अखेरच्या क्षणी कॉलेजमध्ये पोहोचायची. त्यामुळे तिला संपूर्ण ग्रुपसह अखेरच्या बाकावर बसावे लागत असे. वास्तविक ऐश्वर्या सर्व शिक्षकांची प्रिय होती. विशेषत: फिजिक्सच्या शिक्षकांच्या ती खूपच जवळ होती. त्यांनी तिला कॉलेज साप्ताहिकासाठी फोटोशूट करण्याचाही सल्ला दिला होता. वास्तविक ऐश्वर्याला कॉलेजमधील सर्वांत सुंदर मुलगी म्हणून ओळखले जायचे. पुढे तिने ‘मिस वर्ल्ड’चा किताब पटकावून हे सिद्धदेखील केले. 



रिपोर्ट्सनुसार ऐश्वर्याला आर्किटेक्चरमध्ये करिअर करायचे होते. मात्र जेव्हा तिला मॉडलिंगच्या आॅफर मिळू लागल्या, तेव्हा तिने करिअरचा मार्ग बदलला. ऐश्वर्याने १९९४ मध्ये मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता. मात्र त्यावेळी ती दुसºया क्रमांकावर आली होती. सुष्मिता सेनने तो क्राउन स्वत:च्या नावे केला होता. पुढे १९९४ मध्येच ऐश्वर्याची मिस वर्ल्ड म्हणून निवड झाली, तर सुष्मिताला मिस युनिव्हर्सचा किताब मिळाला. 

ऐश्वर्याने तिच्या सौंदर्याच्या बळावर जगभरात स्वत:ची ओळख निर्माण केली. ऐश्वर्या बॉलिवूडमधील पहिली अशी अभिनेत्री आहे, जी ‘द ओप्रा विनफ्रे’ या टॉक शोमध्ये सहभागी झाली होती. 

Web Title: Aishwarya wanted to teach physics tweet to Impress!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.