हॉलिवूड गायकासोबत केलेल्या फोटोशूटवरून ऐश्वर्या राय होतेय ट्रोल, यूजर्सनी दिल्या मजेशीर प्रतिक्रिया!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 17:00 IST2018-04-03T11:30:13+5:302018-04-03T17:00:23+5:30
हॉलिवूड गायकासोबत केलेल्या फोटोशूटवरून ऐश्वर्या राय ट्रोल होत असून, यूजर्सकडून तिच्या या फोटोशूटला मजेशीर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

हॉलिवूड गायकासोबत केलेल्या फोटोशूटवरून ऐश्वर्या राय होतेय ट्रोल, यूजर्सनी दिल्या मजेशीर प्रतिक्रिया!
४ वर्षीय अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिने नुकतेच वोग या फॅशन मॅगझीनसाठी फोटोशूट केले. यामध्ये ती हॉलिवूड गायक फॅरेल विलियम्ससोबत स्टनिंग पोज देताना बघावयास मिळत आहे. अमेरिकन रॅपर फॅरेल विलियम्ससोबत ऐश्वर्याने वोग मॅगझीनसाठी एप्रिल महिन्यातच कुल फोटोशूट केले होते. कव्हर पेजवर झळकलेल्या ऐश्वर्या गाउनमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तर फॅरल कलरफुल अंदाजात दिसत आहे. त्यांच्या या फोटोशूटला चाहत्यांकडून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया मिळत आहेत. काही यूजर्सला ऐश्वर्या आणि फॅरेलचा हा अंदाज खूपच पसंत येत आहे. तर काहींनी यास ‘फोटोशॉप्ड’ असे संबोधले आहे.
![]()
खरं तर ग्लोबल आयकॉन फॅरेल विलियम्स याच्यासोबत ऐश्वर्याचा अंदाज बघण्यासारखा आहे. कारण ती या फोटोशूटमध्ये खूपच हटके अंदाजात बघावयास मिळत आहे. मात्र बºयाचशा सोशल मीडिया यूजर्सनी ऐशवर टीकेची झोड उडविली आहे. काही यास फोटोशॉप्ड असे म्हणत आहेत, तर काही यूजर्सनी लिहिले की, ही जोडी Awkward वाटत आहे.
दरम्यान, अखेरीस ऐश २०१६ मध्ये आलेल्या ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये बघावयास मिळाली होती. सध्या ती ‘फन्ने खां’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती एका गायिकेची भूमिका साकारत आहे. आॅस्कर नामांकित ‘एव्रीबडीस फेमस’ या डच चित्रपटाचा ‘फन्ने खां’ हा अधिकृत रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अतुल मांजरेकर करीत आहेत, तर ऐशसह चित्रपटात अनिल कपूर, राजकुमार रावची महत्त्वाची भूमिका आहे.
ऐश्वर्या राय आणि अनिल कपूूर तब्बल दोन दशकानंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करीत आहेत. या अगोदर हे दोघे २००० साली आलेल्या ‘हमारा दिल आपके पास है’ आणि ‘ताल’ या सुपरहिंट चित्रपटांमध्ये झळकले होते. आता पुन्हा एकदा ही जोडी मोठ्या पडद्यावर धमाल करण्यासाठी येत आहे.